शाळेच्या टीसीसाठी शिक्षकावर चाकू हल्ला, विद्यार्थ्यानं ऑनलाईन मागवला होता चाकू?

गेल्या दिवसात चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. मागील आठवड्यात मुंबईतील धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाची हत्या केली होती. आरोपीने ऑनलाईनने चाकू खरेदी केल्याची बाब उघडकीस आली होती. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एका इंग्रजी शाळेतील शिक्षकावर चाकू हल्ला झाला आहे. हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याने ऑनलाइन पद्धतीने चाकू खरेदी केलाय. (knife) त्यामुळे ऑनलाईन मिळणाऱ्या धारधार शस्त्रांचा मुद्दा समोर येत आहे.


अकोला हादरलं! काँग्रेस नगरसेविकेच्या पतीवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला चाकू हल्ला करणारा हा माजी विद्यार्थी आहे. दरम्यान चाकू हल्ल्यात शिक्षक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, चाकू हल्ला करणारा विद्यार्थी हा २०२३मध्ये त्या इंग्रजी शाळेतील विद्यार्थी होता. तो दुसऱ्या ठिकाणी नोकरी लागली आहे, (knife) त्यासाठी त्याला शाळा सोडल्याचा दाखल लागत होता.टीसी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखल्यावरून शिक्षक आणि त्याच्यात वाद झाला. त्यातून त्याने शिक्षकावर हल्ला केला. याप्रकरणी शहरातील छावणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. विशाल धूशिंग असं शिक्षकाचे नाव असून शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकू हल्ल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर चाकू हल्ला केला होता. कनिका दास उर्फ कनिका विश्वजीत मंडल असं महिलेचं नाव आहे. त्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या होत्या. तर ब्रजकेश दास असं आरोपी पतीनचं नाव आहे. (knife) त्याने दुचाकीनं पत्नीचा पाठलाग करत तिच्यावर चाकू हल्ला केला. आरोपीने चाकूने हातापायावर आणि मानेवर सपासप वार केले.

हेही वाचा :

मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!

महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?

Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?