भाजप आमदाराचं वक्तव्य हे विकृत मानसिकतेचं दर्शन रोहित पवारांचा सरकारवर निशाणा?

नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात वाद पेटला आहे. (Rohit Pawar) यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत सरकारला सुनावले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात नवरात्र उत्सवावरुन वाद सुरु आहे. मंत्री नितेश राणे यांनी थेट गरब्यामध्ये लव्ह जिहाद व्हायला नको म्हणून मुस्लिमांना प्रवेश द्यायला नको असे म्हटले. आता याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर, “प्रत्येक सण-उत्सवात धर्माच्या नावाने भेदाच्या भिंती उभ्या करायच्या, मुस्लिमांना लक्ष्य करायचं आणि त्यावर आपल्या राजकारणाच्या भाकरी भाजायच्या, हीच मुळात भाजपाची संस्कृती आहे आणि मध्य प्रदेशातील भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांच्या वक्तव्यातून ती अधिक ठळकपणे दिसली. मुस्लिमांबद्दलचं त्यांचं वक्तव्य हे राजकारणासाठी समाजाला धर्माच्या आधारावर विभागणाऱ्या विकृत मानसिकतेचं दर्शन घडवतं. पण सत्तेच्या राजकारणासाठी समाजात संशय, द्वेष आणि दुरावा निर्माण करणाऱ्या भाजपाचा हा डाव जनतेच्या लक्षात आल्याने यापुढे तो यशस्वी ठरेलच असं नाही” असे म्हटले. पुढे ते म्हणाले की, “कारण Gen-Z किंवा Gen-Alfa ही पिढी अधिक सजग होतेय. (Rohit Pawar) त्यांच्यासाठी उत्तम शिक्षण, रोजगार हे मूलभूत प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत आणि ही पिढी तोडण्याची नाही, तर जोडण्याची भाषा बोलणारी आहे, हे आता भाजपाने विसरू नये!”

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गरबा कार्यक्रमांतील मुस्लिम तरुणांच्या सहभागाबाबत भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी दिलेल्या विधानाने राजकीय वाद निर्माण झाला आहे. शर्मा म्हणाले, “मुसलमान तरुणांना गरब्याला यायचे असेल तर त्यांनी आपली आई, बहिणी आणि मुलींना सोबत घेऊन यावे. एकटे येऊन हिंदू मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला सडेतोड उत्तर दिले जाईल.”

27 सप्टेंबरला मोर्चा एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी 27 सप्टेंबर रोजी पुण्यात आंदोलन होणार आहे. पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवाचं कारण देत पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. (Rohit Pawar) दरम्यान या आंदोलनाला काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहू शकतात, असं रोहित पवार यांनी म्हटले आहे. पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली तरी 27 सप्टेंबरला कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन करणारच असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

हेही वाचा : 

दिशा सालियान हिच्या वडिलांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंकडे इशारा करत म्हटले?

विसर्जनापूर्वी गणरायाच्या कानात म्हणा, सर्व इच्छा होतील पूर्ण?

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये दुष्काळ जाहीर करा?