गेले काही दिवस महाराष्ट्रात खूप पाऊस पडत आहे. वातावरणात ओलावा आणि दमटपणा पसरला आहे. त्यामुळे कपडे कसे सुकणार? हा प्रश्न जवळपास सर्वांनाच पडला आहे .(atmosphere) शिवाय स्वयंपाकघरातील मसाले देखील या ओलसरपणामुळे खराब होऊ लागले आहेत. तुमचेही मसाले खराब झालेत? तर टेन्शन घेऊ नका. खाली दिलेल्या काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही मसाले पावसाळ्याही टिकवून ठेवू शकता.

मसाले हे पदार्थांची चव वाढवतात. एखाद्या पदार्थाला मसाल्यांमुळे चविष्टपणा येतो. पण जर जास्त आर्द्रतेच्या संपर्कात मसाले येत असतील. तर मसाले लवकर खराब होतात. (atmosphere) त्यामुळे खास करून पावसाळ्यात मसाल्यांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. मसाले खराब झाले असल्यास मसाल्याचा सुगंध नाहिसा होतो आणि चवही लागत नाही. त्याचा रंग बदलू शकतो. किंवा विचित्र वास देखील येऊ शकतो. शिवाय मसाल्यांना किड आणि बुरशी लागते.
मसाल्यांना दमटपणापासून वाचवण्यासाठी नेहमी हवाबंद डब्यांचा वापर करा. मसाले वापरासाठी काढताना नेहमी कोरडा आणि स्वच्छ चमचा वापरा. स्वयंपाकघरातील खिडकी, गॅस स्टोव्ह, सिंक यासोबत मसाल्यांचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्या. (atmosphere) मध्येच केव्हातरी मसाल्यांना कडक उन्हात सुकत घाला. मसाले नेहमी कोरड्या काचेच्या बरणीत साठवा. आवश्यक असल्यास फूड ग्रेडचे सिलिका जेल किंवा ओलावा शोषून घेणारे पॅक देखील वापरू शकता. परंतु त्याच्या अतिवापराने देखील मसाले खराब होऊ शकतात.
कोणत्या चूका टाळ्याव्यात?
1) मसाले फ्रिज मध्ये ठेवणे टाळा. कारण बाहेर काढल्यावर तापमानात बदल होतो आणि मसाले खराब होऊ शकतात.
2) प्लॅस्टिकच्या बरण्यांनमध्ये टाळा. काचेच्या बरणीत मसाले उत्तम राहतात. ओला चमचा किंवा ओले हात सतत मसाल्यांना लावू नये.
3) खराब झालेले मसाले केवळ अन्नाची चवच बिघडवत नाही तर त्याचा दुष्परिणाम आरोग्यावरही होतो.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींचं बँक खातं होणार फुल्ल? आता थेट 3000 रुपये?
पुणे-नाशिककरांनो रेल्वे संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी?
WhatsApp वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी महत्त्वाच्या फीचरबाबत केंद्र सरकार अलर्ट?