सुरक्षित आणि निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिस ची रिकरिंग डिपॉझिट योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या योजनेत कमी रकमेपासून गुंतवणूक सुरू करता येते.(Post Office) दरमहा नियमित बचत केल्यास मुदत पूर्ण झाल्यानंतर चांगला निधी तयार होऊ शकतो. निश्चित व्याजदर आणि सरकारी संरक्षणामुळे अनेक गुंतवणूकदार या योजनेला प्राधान्य देतात.

दरमहा 3 हजारांची गुंतवणूक केल्यास किती मिळेल पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग्स रिकरिंग डिपॉझिट अकाउंट मध्ये सध्या 6.7 टक्के वार्षिक व्याजदरानुसार गुंतवणूक करता येते. या खात्याची सुरुवात अवघ्या 100 रुपयांपासून करता येते, तर कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा 3,000 रुपये जमा करून ही गुंतवणूक सलग 10 वर्षे सुरू ठेवली, तर त्याची एकूण गुंतवणूक 3,60,000 रुपये होईल. 6.7 टक्के व्याजदरानुसार या कालावधीनंतर सुमारे 5,12,565 रुपयांचा निधी तयार होऊ शकतो. (Post Office) यामध्ये 1,52,565 रुपये ही केवळ व्याजाची रक्कम असेल. या योजनेची मूळ मुदत पाच वर्षांची असली तरी खातेधारकाला अर्ज करून ती आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याची सुविधा उपलब्ध आहे.
मुदतवाढ न घेतली तरी मॅच्युरिटीनंतर खाते पाच वर्षांपर्यंत कोणतीही नवीन गुंतवणूक न करता सुरू ठेवता येते. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास नोंदणीकृत नामनिर्देशित व्यक्ती संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये दावा करून जमा रक्कम प्राप्त करू शकते.खाते उघडण्याचे नियम आणि इतर सुविधा या योजनेत कोणताही भारतीय नागरिक एकट्याच्या किंवा संयुक्त नावाने खाते उघडू शकतो. पालकांना आपल्या मुलांच्या नावानेही खाते सुरू करता येते. 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलाच्या नावाने स्वतंत्र खाते उघडण्याची परवानगी आहे. अल्पवयीन खातेधारक 18 वर्षांचा झाल्यानंतर नवीन खाते उघडण्याचा फॉर्म आणि ताज्या केवायसी कागदपत्रांसह ते खाते प्रौढ खात्यात रूपांतरित करावे लागते.
या योजनेत किमान 100 रुपये जमा करता येतात. खाते सुरू करताना भरलेला पहिला हप्ता पुढे दरमहा भरावयाच्या हप्त्याइतकाच असतो. महिन्याच्या 1 ते 15 तारखेपर्यंत खाते उघडल्यास पुढील हप्ता त्याच महिन्याच्या 15 तारखेपर्यंत भरावा लागतो. 16 तारखेनंतर खाते सुरू केल्यास प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसापर्यंत हप्ता जमा करावा लागतो. (Post Office) खाते किमान एक वर्ष चालू राहून 12 मासिक हप्ते भरल्यानंतर जमा रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत कर्ज घेण्याची सुविधा मिळते. या कर्जावर आरडीच्या व्याजदरापेक्षा 2 टक्के अधिक व्याज आकारले जाते. तसेच खाते उघडल्यापासून तीन वर्षांनंतर ते मुदतपूर्व बंद करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. मात्र, मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद केल्यास आरडीऐवजी पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या नियमानुसार व्याज दिले जाते. आधीच काही महिन्यांचे हप्ते आगाऊ भरले असल्यास तो कालावधी पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद करता येत नाही.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींचं बँक खातं होणार फुल्ल? आता थेट 3000 रुपये?
पुणे-नाशिककरांनो रेल्वे संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी?
WhatsApp वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी महत्त्वाच्या फीचरबाबत केंद्र सरकार अलर्ट?