वाहनचालकांनो सावधान! (FASTag)देशभरातील टोल नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून 10 एप्रिलपासून नवीन FASTag नियम लागू झाले आहेत. या नव्या नियमांमुळे आता टोल प्लाझावर रोख रक्कम देण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीनेच करावे लागणार आहेत.
नवीन नियमांनुसार, जर तुमच्या (FASTag) वाहनावर वैध FASTag नसेल तर तुम्हाला टोल भरताना अतिरिक्त दंड भरावा लागणार आहे. साधारण टोल रकमेपेक्षा 25% जास्त शुल्क आकारले जाईल. म्हणजेच FASTag नसताना प्रवास करणे आता अधिक महाग पडणार आहे. इतकंच नाही तर काही ठिकाणी FASTag नसल्यास किंवा तो ब्लॅकलिस्ट असल्यास दुप्पट टोल आकारला जाऊ शकतो, अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासापूर्वी FASTag सक्रिय आहे का आणि त्यामध्ये पुरेसा बॅलन्स आहे का, याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
सरकारच्या या निर्णयामागे (FASTag)टोल प्लाझांवरील गर्दी कमी करणे, वाहतूक सुरळीत करणे आणि इंधनाची बचत करणे हा मुख्य उद्देश आहे. मात्र, अचानक झालेल्या बदलांमुळे अनेक वाहनचालकांमध्ये संभ्रम आणि नाराजी देखील पाहायला मिळत आहे. म्हणूनच, जर तुम्ही नियमित हायवे प्रवास करत असाल तर FASTag वापरणे आता केवळ सोयीचे नाही, तर बंधनकारक झाले आहे. अन्यथा प्रत्येक प्रवासात जादा पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.