पुण्याचा मुंबईशी संपर्क तुटला, एसटी वाहतूक पूर्णपणे बंद?

मुंबई, पुणे आणि घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.तसेच, मुंबई-पुणे जुना महामार्गही बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि मुंबईदरम्यानची एसटी बस सेवा पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. (Ghat regions) त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, अनेकांना आपले प्रवासाचे नियोजन बदलावे लागत आहे.

राज्य परिवहन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पुण्याहून मुंबईकडे रवाना झालेल्या चार एसटी बस उर्से टोलनाका परिसरात अडकल्या होत्या. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या सर्व बस सुरक्षितपणे पुन्हा पुण्याकडे परत पाठवण्यात आल्या आहेत. रस्ता पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत प्रवास टाळावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. (Ghat regions) दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, पुणे, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरासाठी पुढील दोन दिवसांचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, शहरासाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. (Ghat regions) अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.सततच्या पावसामुळे प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि एसटी विभाग सतर्क असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांनुसारच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?

पीएफ खातेधारकांसाठी नवीन नियम, पेन्शनबाबतही मोठे बदल?

धाड धाड कोसळले तेलाचे भाव, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थेट?