शरद पवार महायुतीसोबत जाणार? राजकीय चर्चांवर सुप्रिया सुळेंनी सोडलं मौन, म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते विनोद तावडे यांच्यासोबत अनेकदा भेट झाल्याचे त्यांनी मान्य केले, (Supriya Sule) मात्र त्या भेटींना कोणताही राजकीय अर्थ नसल्याचे स्पष्ट करत सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी फेटाळले आहे.

तावडेंसोबतच्या भेटींवर दिले स्पष्टीकरण गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्याचबरोबर पक्षातील नेत्यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात झालेल्या कथित बैठकीबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संबंधित बैठक झाली की नाही याची माहिती त्यांना नाही. (Supriya Sule) मात्र, त्या आणि विनोद तावडे अनेकदा भेटत असतात. दोघेही एका समितीवर कार्यरत असल्यामुळे गेल्या महिनाभरातच त्यांची तब्बल 21 वेळा भेट झाली आहे. या बैठकींमध्ये भाजपचे अनेक वरिष्ठ नेते तसेच पक्षाध्यक्षही उपस्थित असतात. त्यामुळे अशा भेटींना राजकीय रंग देण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सत्तेपासून राम मंदिर आणि कर्जमाफीपर्यंत सरकारवर टीका राष्ट्रवादी भविष्यात सत्तेत सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी पक्षाची भूमिका जनतेची सेवा करण्याची असल्याचे सांगितले. गेल्या 12 वर्षांपासून राष्ट्रवादीबाबत विविध प्रकारच्या चर्चा सातत्याने होत असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात परिस्थिती तशी निर्माण झाली तर पक्षाला संघर्ष करून सत्ता मिळवावी लागेल, असे म्हणताना पुढे काय घडेल हे देवालाच माहीत असल्याची मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली. (Supriya Sule) यावेळी त्यांनी अयोध्या येथील राम मंदिर परिसरातील कथित चोरीच्या प्रकरणावरूनही सरकारवर निशाणा साधला. संपूर्ण देशातील जनतेने योगदान देऊन उभारलेल्या मंदिरात अशा प्रकारचे प्रकार घडत असतील तर त्याबाबत सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा :

LPG गॅस सिलिंडरचे संकट संपणार, भारतीय तेल कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय?

शिवसेनेचे सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेससोबत?

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनो सावधान? तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?