सावधान! BCCI च्या माजी शेफने पनीरला म्हटलं सर्वात भेसळयुक्त अन्न तुम्हीही आवडीने खाताय?

बीसीसीआयचे माजी शेफ अरुण चौहान यांनी पनीरला (कॉटेज चीझ) आजच्या काळातील सर्वात भेसळयुक्त अन्न म्हटलं आहे.बीसीसीआयचे माजी शेफ अरुण चौहान यांनी पनीरला (कॉटेज चीझ) आजच्या काळातील सर्वात भेसळयुक्त अन्न म्हटलं आहे. वरुण तिवारी यांच्या यूट्यूब पॉडकास्टवर बोलताना चौहान म्हणाले, “पनीर हे दुधापासून बनवलं जातं हे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण आजच्या काळात ते शुद्ध मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला कुठेही शुद्ध पनीर मिळणार नाही. मी शेवटचं पनीर कधी खाल्लं होतं, हे मला आठवतही नाही. आमच्या रेस्टॉरंटमध्ये आम्हाला उत्तम दर्जाचे पनीर मिळतं, (Former) पण त्यामुळे फॅट वाढतं. माझं वजन लवकर वाढत असल्याने मी पनीर खाणं टाळतो.”

ठाणे येथील किम्स हॉस्पिटलच्या चीफ डायटिशियन डॉ. अमरीन शेख यांनीही या चिंतेत तथ्य असल्याचं मान्य केलं आहे. शेख म्हणाल्या, “पनीर हे एक लोकप्रिय दुग्धजन्य उत्पादन आहे. इतर अनेक जास्त मागणी असलेल्या खाद्यपदार्थांप्रमाणेच पनीरमध्येही काही वेळा भेसळ केली जाऊ शकते, विशेषतः जेव्हा ते अनधिकृत विक्रेत्यांकडून घेतलं जातं. पनीरचं प्रमाण आणि नफा वाढवण्यासाठी त्यात स्टार्च, डिटर्जंट, कृत्रिम दुधाचे घटक किंवा निकृष्ट दर्जाचं दूध वापरून भेसळ केली जाऊ शकते. मात्र याचा अर्थ असा नाही की बाजारातील सर्वच पनीर असुरक्षित आहे. ग्राहकांनी सरसकट असा विचार न करता, विश्वासू आणि नामांकित ठिकाणांहूनच पनीर खरेदी करण्यावर भर दिला पाहिजे.”

पनीरमध्ये जास्त भेसळ का होते पनीर टिकण्याचा कालावधी तुलनेने कमी असतो आणि संघटित तसेच असंघटित दोन्ही क्षेत्रांत त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जाते. “शाकाहारी लोकांकडून नियमितपणे खाल्लं जाणारं हे एक प्रोटीन-रिच अन्न असल्याने बाजारात याला मोठी मागणी आहे. (Former) यामुळे पुरवठा साखळीतील काही भागांमध्ये अनैतिक पद्धतींचा वापर करण्याची संधी निर्माण होते” असे शेख यांनी अधोरेखित केले. पनीर फ्रेश असल्यास दुधाचा सौम्य सुवास असतो, त्याचं टेक्सचर मऊ पण घट्ट असतो आणि त्याचा रंग नैसर्गिक पांढरा असतो. शेख म्हणाल्या, “पनीरचं टेक्सचर रबरासारखं असणं, रंग अतिशय चमकदार असणं, आंबट वास येणं किंवा ते हाताने चुरडल्यास लगेच बारीक तुकडे होणं हे खराब दर्जाचं लक्षण असू शकतं. तसेच ग्राहकांनी बाजारात अत्यंत कमी किमतीत मिळणाऱ्या पनीरबाबतही सावध राहिलं पाहिजे.”

पनीर खाणं पूर्णपणे बंद करावं का डॉ. शेख यांनी यासाठी स्पष्ट नकार दिला. त्या म्हणाल्या, “पनीर हे अजूनही उच्च दर्जाचं प्रोटीन, कॅल्शियम आणि आवश्यक पोषक तत्वांचा एक उत्तम स्त्रोत आहे. आपल्या आहारातून ते पूर्णपणे वगळण्याऐवजी, ग्राहकांनी ते कोठून खरेदी करत आहोत यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. घरगुती पनीर किंवा अन्न सुरक्षा मानकांचं पालन करणाऱ्या नामांकित ब्रँड्सची उत्पादनं सहसा अधिक सुरक्षित असतात.” भीती बाळगण्यापेक्षा अन्नाचा दर्जा आणि त्याचा स्त्रोत यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. “जेव्हा पनीर विश्वासू पुरवठादारांकडून खरेदी केलं जातं आणि योग्य पद्धतीने साठवलं जातं, (Former) तेव्हा ते निरोगी आहाराचा भाग असू शकतं. जागरूकता महत्त्वाची आहे, परंतु केवळ भीतीपोटी पौष्टिक अन्न टाळणं हा त्यावरचा उपाय नाही” असं शेख यांनी शेवटी सांगितलं.

हेही वाचा :

इचलकरंजी बनली चिखलकरंजी नागरिक संतप्त महापौरांचे कामे थांबवण्याचे आदेश?

नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा कृष्णामाई दत्तगुरूंच्या भेटीला भाविकांची स्नानपर्वणी?

E20 पेट्रोलमुळे गाडीचे इंजिन खराब होणार का?