सोमवती अमावस्येला ५ भाग्यशाली राशींचे पालटणार नशीब?

जुलै 2026 मधील सोमवती अमावस्येला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सोमवार आणि अमावस्या यांचा दुर्मिळ संयोग आल्याने भगवान शिवाची उपासना, पितृकार्य, स्नान-दान आणि जप-तपासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. यंदा ही तिथी नेमकी कधी आहे, शुभ वेळ कोणती आणि या दिवशी कोणते धार्मिक विधी करावेत, याबाबत जाणून घेऊया.

तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व मराठी दिनदर्शिकेनुसार आषाढ अमावस्या मंगळवार, 14 जुलै 2026 रोजी आहे. मात्र अमावस्या तिथीची सुरुवात 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:50 वाजता होणार असून ती 14 जुलै रोजी दुपारी 3:12 वाजता समाप्त होईल. यंदा अमावस्येची तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या म्हणून मान्यता मिळाली आहे.धार्मिक परंपरेनुसार सोमवार हा भगवान शिवाचा दिवस मानला जातो. त्याच दिवशी अमावस्येचा योग आल्यामुळे या तिथीचे महत्त्व अधिक वाढते. या दिवशी भगवान शिव, माता पार्वती आणि पितरांची पूजा केल्यास पुण्यप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. (Amavasya) तसेच स्नान, दान, जप, तप आणि पितृतर्पण केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष कमी होण्यास मदत होते, असे धार्मिक मानले जाते.

शिवपूजेची पद्धत आणि या दिवशी काय करावे धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्येला शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र आणि धतुरा अर्पण करून ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी या दिवशी व्रत करतात. (Amavasya) काही भागांत पिंपळाच्या वृक्षाची पूजा करून त्याला 108 प्रदक्षिणा घालण्याचीही परंपरा आहे.या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी, शक्य असल्यास पितरांसाठी तर्पण किंवा श्राद्ध करावे तसेच गरजूंना अन्न, वस्त्र, तीळ, धान्य, गूळ, तूप, फळे किंवा आर्थिक मदत दान करावी. (Amavasya) याचबरोबर वादविवाद, राग, अपशब्द, कोणाचाही अपमान तसेच तामसिक आहार आणि व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला धार्मिक परंपरेत दिला जातो. विविध धार्मिक मान्यतांनुसार श्रद्धेने केलेली पूजा, जप आणि दान विशेष फलदायी मानले जाते.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?