युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे गेल्या काही वर्षात व्यवहार गतिमान झाले आहेत. व्यवहाराची परिभाषाच बदलली आहे. (Payment) तर AI ने होणार युपीआय पेमेंट करण्याची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. NPCI चे भन्नाट फीचर युझर्सच्या भेटीला येणार आहे. काय आहे अपडेट?

युपीआय युझर्ससाठी एक आनंदवार्ता येऊन धडकली आहे. डिजिटल पेमेंट अधिक स्मार्ट होईल. युनिफाईड एजेंट प्रोटोकॉलवरसध्या काम सुरू आहे. त्यातंर्गत AI-एजेंट युझर्सच्या परवानगीने युपीआयच्या माध्यमातून बिल पेमेंटपासून लहान लहान व्यवहार बिनदिक्कत पूर्ण करेल. हा प्रोटोकॉल राष्ट्रीय देयके महामंडळा बाजारातील बड्या खेळाडूंसोबत मिळून तयार करत आहे. AI एजेंटच्या मदतीने सुरक्षित नोंदणी, योग्य पडताळा आणि अधिकृत व्यवहाराची शाश्वती निश्चित करण्यात येईल.
डिजिटल पेमेंट अधिक स्मार्ट होण्यासाठी एक प्रक्रिया तयार करण्यात येत आहे. युझर्सकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) आर्थिक व्यवहारासाठी वापर करण्याची परवानगी घेण्यात येईल. सर्वच व्यवहार एआयच्या माध्यमातून होणार नाही. पण हिस्ट्रीच्या आधारे दरमहा होणारा निश्चित खर्च , त्यात शिकवणी खर्च, ठराविक बिलं, निश्चित पेमेंट्स एआय पूर्ण करेल. परिणामी तुमचा वेळ तर वाचेलच. (Payment) पण विलंब शुल्काचा त्रास वाचेल. तुमची बाजारातील पत कायम राहील. या नवीन प्रक्रियेला युनिफाई एजेंट प्रोटोकॉलअसे नाव देण्यात आले आहे. AI एजेंटच्या माध्यमातून सुरक्षित आणि विश्वासहार्य व्यवहार पूर्ण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
हे भन्नाट फीचर यशस्वी ठरले तर जगभरात ते हिट ठरेल असा अंदाज वर्तवला जात आहे. इतर देशात UPI चा मोठा वापर वाढण्यास मदत मिळण्याची शक्यता आहे.बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, हा प्रोटोकॉल तयार करण्याची जबाबदारी राष्ट्रीय देयके महामंडळाकडे (NPCI) सोपवण्यात आली आहे. यासाठी तंत्रज्ञानातील आघाडीच्या कंपन्या आणि इंडस्ट्रीतील तज्ज्ञांकडून सूचना, हरकती मागवण्यात आल्या आहेत. विविध प्लॅटफॉर्मवरच एकच सिस्टिम क्षमतेने आणि प्रभावीरित्या कार्यरत राहावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.या योजनेत सध्याच्या युपीआय सिस्टिममध्ये मोठा बदल करण्यात येणार नाही. नवीन प्रोटोकॉल याच पेमेंट पद्धतीसोबत काम करेल. (Payment) त्यांच्या मदतीला एआय एजेंट येईल. त्याच्यामुळे काही बिलं, पेमेंट करणं अगदी सोपं होईल.
अर्थात या व्यवहाराची रक्कम मोठी नसेल. सध्याच्या डिजिटल स्ट्रक्चरवर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. प्रत्यक्षात ही पद्धत अंमलात यायला अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्याला अजून किती दिवस लागतात याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही पेमेंट ॲप युझर्सला मोाबाईल नेटवर्क पोस्टपेड बिल, विद्युत बिल, गॅस सिलेंडर पेमेंट आणि इतर व्यवहारांची आठवण करून देतात. त्यापेक्षा एआय व्यवहार पद्धत वेगळी असेल.
हेही वाचा :
कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?
क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?
पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?