स्वामी समर्थांवरील चित्रपटाला शाहरुखची मदत का? ट्रोल करणाऱ्यांना प्रवीण तरडे स्पष्टच बोललो, हिंदू-मुस्लीम हा प्रश्न?

बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान एका मराठी चित्रपटाला पाठिंबा दिल्यामुळे(Bollywood’s) सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करत आहे. शाहरुखने प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाचं डीसीपी बिल माफ केलं होतं. खुद्द प्रवीण तरडेंनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. मात्र त्यानंतर नेटकरी शाहरुखलाच प्रचंड ट्रोल करत आहेत. स्वत: मुस्लीम असताना शाहरुखने एका हिंदू देवतेवर आधारित चित्रपटाची मदत का केल, असा सवाल टीकाकारांनी केला आहे. ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. मग शाहरुखने केलेल्या मदतीचा इतका गवगवा का, असा सवाल नेटकऱ्यांनी तरडेंना केला. त्यावर आता त्यांनी उत्तर दिलं आहे.शाहरुखला ट्रोल करणाऱ्यांना तरडेंचा सवालया पॉडकास्ट मुलाखतीत प्रवीण तरडे म्हणाले, “यात हिंदू-मुस्लीम हा मुद्दा कुठून आला? तेसुद्धा फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहेत आणि मीसुद्धा.

आम्ही त्यांच्या कंपनीकडे यासाठी गेलो होतो, कारण आमच्याकडे फक्त 12-13 लाख(Bollywood’s) रुपये होते आणि बिल 43 लाख रुपयांचं होतं. शाहरुख खानने त्याच्या टीमला विचारलं की, हा चित्रपट कसा आहे? त्यांच्या टीमने सांगितलं की, हा चित्रपट खूप चांगला आहे. त्यानंतर लगेच त्यांनी सांगितलं की, चित्रपटाला डीसीपी देऊन टाका, पैशांबद्दल नंतर बघू. आमचा चित्रपट प्रदर्शनासाठी पूर्णपणे तयार होता आणि आम्ही रक्कम भरली होती. पण त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की, आधी त्यांना डीसीपी देऊन टाका, बिलाचा हिशोब आपण नंतर करू. हा एखाद्याच्या मनाचा मोठेपणा किंवा दयाळूपणा नाही का?”जर कोणी इतक्या मोठ्या मनाने आपली मदत करत असेल तर फक्त त्याची जात किंवा धर्म पाहून आपण त्याच्या दयाळूपणाकडे दुर्लक्ष करायचं का?

आपण त्याच्या मदतीबद्दल त्याचे आभार मानले पाहिजेत. जिथपर्यंत हिंदुत्वाचा प्रश्न आहे,(Bollywood’s) तर मला कोणालाही काहीही सिद्ध करायची गरज नाही. शाहरुख खानचे आभार मानण्याचा माझ्या हिंदुत्ववादी विचारसरणीशी काहीही संबंध नाही. चांगला माणूस हा चांगलाच असतो”, अशा शब्दांत त्यांनी ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं.प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ हा मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील यशस्वी चित्रपट ठरला आहे. रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटानंतर ‘देऊळ बंद 2’ हा 100 कोटी रुपये कमावणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?