औट घटकेची शांतता ठरली!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

अमेरिका आणि इराण यांच्यात अगदी काहीच दिवसापूर्वी झालेला शांतता करार अल्पजीवी ठरला आहे. आणि त्याला दोन्ही देश जबाबदार आहेत. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खोमेनी यांना अंतिम निरोप, अलविदा केले जात असताना अमेरिकेने इराणवर भीषण हल्ला केला आहे. (countries) आता हे युद्ध अतिशय भीषण वळण घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी पुन्हा एकदा पश्चिम आशिया संकटात सापडला आहे किंवा सापडणार आहे.

इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला यांना अखेरचा अलविदा करण्याच्या मानसिकतेत इराणची जनता आहे. आयातुल्ला यांचा जनाजा गुरुवारी इराक नजीकच्या गावात पोहोचला आहे आणि त्यांना तेथे दफन केले जात आहे. एकीकडे संपूर्ण इराण शोकसागरात बुडालेला असताना इराणकडूनच हार्मूझ सामुद्रधुनीतून जलवाहतूक करत असलेल्या तीन जहाजांवर हल्ले करण्यात आले. (countries) त्यामुळे संतप्त झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी इराणवर मोठे हल्ले चढवले. इराणच्या अनेक भागात हे हल्ले करण्यात आले. शस्त्र संधीचे उल्लंघन इराणकडून करण्यात आले.इराणची जनता आयातुल्ला यांच्या अंत्ययात सहभागी झालेली असताना, लक्षावधी लोक रस्त्यावर उतरलेले असताना तीन मालवाहतूक जहाजांवर हल्ले करण्याची आगळीक इराणने केली आणि अमेरिकेचा रोष ओढवून घेतला. डोनाल्ड ट्रम्प हे त्याआधी सुद्धा युद्ध खोरीची भाषा करत होते.

विरामचे सर्वच नेते विकृत असल्याचे ते सांगत होते. आमच्या मनात आले तर इराण संपूर्णपणे नष्ट होईल अशी जहाल भाषा ट्रम्प कडून सुरू होती. म्हणजेच शांतता करार हार्मुझ च्या समुद्रात या दोघांनी बुडवून टाकला आहे असे म्हणता येईल. शांतता करारावरील केलेल्या सह्यांची शाईसुद्धा वाळायच्या आत मध्य पूर्वेत युद्धाचा पुन्हा भडका उडतो आहे. आयातुल्ला यांचा दफनविधी पूर्ण झाल्यानंतर इराण एका मोठ्या युद्धाची तयारी करेल. अर्थात त्याला तोडीस तोड उत्तर अमेरिकेकडून दिले जाईल. आता इजराइल देखील अमेरिकेच्या बरोबरीने या युद्धात उतरेल. औट घटकेचा शांतता करार ठरल्यानंतर आता एका मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या युद्धाची नांदी सुरू झाली आहे. दोन्हीकडून कमालीची ताठर भूमिका घेतली जात असल्यामुळे पश्चिम आशियातील देश त्यामध्ये भरडले जाणार आहेत. दोनच दिवसापूर्वी पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांनी
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध समाप्तीमुळे ऊर्जा संकट टळले आहे.

युद्धकाळात आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे भारताला या युद्धाची फार मोठी झळ बसली नाही असे म्हटले आहे. या दोन देशांमधील शांतता करार चिरकाल टिकेल असा विश्वास मोदी यांना वाटला असावा. (countries) पण अचानक सुरू झालेल्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी चिथावणीखोर भाषा सुरू केल्यानंतर इराणच्या नेत्यांच्याकडूनही तितकीच जहाल भाषा केली जाऊ लागली आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही अमेरिकेची लढत राहू असा निर्धार इराणच्या नेत्यांनी केला आहे. वात दोन्हीकडून पेटली आहे, त्याच्या झळा ज्यांचा काहीच संबंध नाही अशा देशांना बसणार आहे, बसतो आहे. अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात आतापर्यंत तीन वेळा शस्त्र संधी झाली आहे. नुकताच झालेला शांतता करार हा दीर्घकालीन शस्त्र संधीचा संदेश मानला जात होता. त्यावर या दोन्ही देशांनी पाणी फेरले आहे.

‌ नाटो राष्ट्रांच्या परिषदेत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसी झालेला शांतता करार विसर्जित करण्यात आला असल्याची घोषणा केली. इराण मधील हल्ल्याची तीव्रता वाढवणार असल्याचे सांगताना ट्रम्प महाशय यांनी इराणच्या नागरी वस्त्यांवर आता हल्ले केले जातील असा इशारा देऊन युद्ध नियमावली अमान्य केली आहे. एकीकडे इराणच्या अनेक भागात भीषण हल्ले चढवत असतानाच ट्रम्प महाशयांनी इराण बरोबरच्या चर्चेची दारे अद्यापही आम्ही बंद केलेली नाहीत हे सुद्धा सांगून टाकले आहे. म्हणजे त्यांच्या मनात नेमके काय आहे हे समजायला मार्ग नाही. एकीकडे हल्ले आणि दुसरीकडे चर्चेची तयारी हा विरोधाभास पाहायला मिळतो आहे. अमेरिकेच्या हितसंबंधाला प्राधान्य देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम आशियातील देशांशी आपले काही देणे घेणे नाही अशी भूमिका घेतली आहे आणि तिचे समर्थन कोणीही करणार नाही.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?