पहिली, दुसरी आणि तिसरी पत्नी आमिर खानचा मोठा निर्णय?

बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या यक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. अलीकडेच आमिर खानने गौरी स्प्रेटसोबत लग्न केलं. त्यानंतर आता त्याच्या नव्या घराबाबतही मोठी माहिती समोर आली आहे. (Aamir Khan) नुकतंच, आमिर खानने मुंबईत नव्या आलिशान घरासाठी तब्बल 100 कोटी रुपयांची अॅडव्हान्स रक्कम दिल्याची चर्चा आहे.

फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, आमिर खानचे हे नवे घर मुंबईतील खार परिसरात उभारल्या जात असलेल्या मरीना टॉवर्स प्रकल्पात असणार आहे. सध्या आमिर आणि गौरी स्प्रेट पाली हिल परिसरातील त्यांच्या निवासस्थानी राहत असल्याचे सांगितले जाते. मात्र, नवीन टॉवरचे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब तेथे राहण्याची योजना असल्याचे वृत्त आहे. (Aamir Khan) अनेक फ्लॅट खरेदी केल्याची चर्चा वृत्तांनुसार, आमिर खानने या प्रकल्पात जवळपास अनेक फ्लॅट खरेदी केले आहेत. या इमारतीचे बांधकाम सुरू असून ते 2030 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक कुटुंबीयासाठी स्वतंत्र मजला ठेवण्याची योजना असल्याचेही सांगितले जात आहे.

गौरी स्प्रेट आणि तिचा मुलगा क्विन यांच्यासाठी स्वतंत्र मजला राखून ठेवण्यात आला आहे. तसेच आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता आणि मुलगा जुनैद यांच्यासाठी वेगळा फ्लोर, तर दुसरी पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद यांच्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. (Aamir Khan) याशिवाय, आमिर खानची आई जीनत हुसेन तसेच त्याच्या बहिणी निखत आणि फरहत यांच्यासाठीही स्वतंत्र फ्लोर असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.2030 मध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र सध्या आमिर खान आपल्या कुटुंबीयांसोबत राहत असून, नवीन टॉवर पूर्ण झाल्यानंतर सर्व कुटुंबीय एकाच संकुलात राहतील, अशी माहिती समोर येत आहे. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहावेत, या उद्देशाने आमिर खानने हा निर्णय घेतल्याची चर्चा असली तरी याबाबत अभिनेत्याने किंवा त्याच्या टीमने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा :

बच्चू कडू आक्रमक मंत्र्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव केला सादर?

अशैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर?

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये जगाला दिसली भारताची ताकद : मोदी?