देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला. त्यांच्या दाव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. (corporators) पण त्याचवेळी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. भाजप लोकसभेत आपल्या खासदारांची संख्या वाढवण्यासाठी इतर पक्षांतील खासदारांना मंत्रिपदाचं प्रलोभन दाखवत त्यांना भाजपमध्ये खेचत आहेत.

दिल्ली मात्र मोठी राजकीय घडामोड झाली असून अख्खा पक्ष भाजपमध्ये विलीन झाला आहे. दिल्लीतील सत्ता मिळवल्यानंतर भाजपने महापालिकेवरही वर्चस्व मिळविण्यासाठी कंबर कसली असून त्याच पार्श्वभूमीवर भाजपने नेते, नगरसेवक न फोडता अख्खा पक्षच आपल्यासोबत आणला आहे.आम आदमी पक्षातून १४ महिन्यांपूर्वी बाहेर पडत १६ नगरसेवकांनी इंद्रप्रस्थ विकास पार्टी या पक्षाची स्थापना केली. (corporators) आता या सर्व १६ नगरसेवकांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केलाय. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करण्यात आलं. त्यामुळे महापालिकेत भाजपची ताकद वाढलीय.
दिल्लीत मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुकीत आपचा दारूण पराभव झाला होता. पक्षाच्या हातून सत्ता गेल्यानंतरच तीनच महिन्यांत १६ नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडली आणि त्यांनी नवा पक्षा स्थापन केला होता. परिणामी आपच्या हातून महापालिकेची सत्ताही गेली. आता पुढील वर्षी महापालिकेची निवडणूक आहे. (corporators) यापार्श्वभूमीवर १६ नगरसेवकांनी भाजपमध्ये विलीन होत तिकीट पक्के केल्याचे मानले जातय.आयव्हीपी पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याने भाजपच्या नगरसेवकांचा आकडा १३९ वर पोहोचलाय. दिल्ली महापालिकेतील नगरसेवकांची एकूण संख्या २५० एवढी आहे. त्यामुळे आता भाजपकडे एकहाती बहुमत आलंय. यापूर्वी भाजपच्या नगरसेवकांची संख्या १२३ होती. तर २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी भाजपचे केवळ १०४ नगरसेवक निवडून आले होते. आम आदमी पक्षाने त्यावेळी विजय मिळवत सत्ता काबीज केली होती.
हेही वाचा :
बच्चू कडू आक्रमक मंत्र्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव केला सादर?