एक दिवसाचा भिकारी?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

बुवांच्या कीर्तनाचा तो शेवटचा दिवस होता. पूर्व रंगात ते श्रोत्यांना अनेक दृष्टांत सांगत होते. हल्ली प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे, आणि ती जीवघेणी आहे, मात्र असे एक क्षेत्र आज शिल्लक आहे, की तिथे स्पर्धा नाही. हे क्षेत्र आहे माणूस बनण्याचे! बुवांनी श्रोत्यांचे केलेले हे समुपदेशन गांभीर्याने विचार करावा असे आहे. माणूस बनवण्याची जर स्पर्धा सुरू झाली तर हे जग किती सुंदर बनेल!

जैन समाजाचे अध्यात्मिक गुरू नम्र मुनी महाराज यांनी मुंबईच्या घातक कोपर पूर्वचे भाजपाचे विद्यमान आमदार श्रीयुत पराग शहा यांना “तू एक दिवसाचा भिकारी हो! दिवसभर भीक माग”असे चमत्कारिक आवाहन केले.कार्पोरेट जगतात वावरणाऱ्या, आलिशान निवासस्थानात राहणाऱ्या,चंगळवादी संस्कृतीत जगणाऱ्या आमदार पराग शहा यांच्यासाठी हे आवाहन म्हणजे एक प्रकारचे आव्हान होते. हे आव्हान त्यांनी स्वीकारले आणि त्यांचाच मतदार संघ असलेल्या घाटकोपरमध्ये ते दोन दिवसापूर्वी दिवसभर अक्षरशः भीक मागत फिरत होते. (audience) त्यासाठी त्यांनी आपला लुक पूर्णपणे बदलला होता. अगदी जवळच्या माणसांनाही ओळखता येणार नाही असा भिकाऱ्याचा अवतार त्यांनी घेतला होता.

दोन-तीन वर्षांपूर्वी स्वप्निल जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला”भिकारी”नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो एका उद्योगपती दांपत्याचा एकुलता एक मुलगा असतो. आणि त्याच्या आईने त्याला एक दिवसाचा भिकारी हो, आणि मग तुला आयुष्य म्हणजे नेमके काय असते याचा साक्षात्कार होईल असे सांगितलेले असते. आणि म्हणून तो भिकारी होऊन आयुष्य जगत असतो. ही सिनेमामधली गोष्ट झाली. प्रत्यक्ष वास्तव जीवनात एक उद्योगपती,एक लोकप्रतिनिधी त्याच्या अध्यात्मिक गुरूंनी सांगितले म्हणून एक दिवसाचा भिकारी बनतो ही गोष्टच विस्मयकारक आहे. (audience) त्यांनी या एक दिवसात समाजातील माणसाचा शोध घेतला की स्वतःमधील माणूस शोधला हे त्यांनी सांगायला हवे.

घाटकोपरमध्ये त्यांनी दिवसभर भीक मागितली. त्यांना ते पराग शहा आहेत म्हणून कोणीही ओळखले नाही. त्यांना कोणी दोन रुपये दिले, कुणी पाच रुपये दिले, तर कोणी पुढे जा म्हणून सांगितले, तर कोणी चांगला धडधाकट दिसतोस, काम कर असा फुकटचा सल्लाही दिला असेल, कुणी त्यांना समोसा दिला, आणखी कुणी खाऊचे पदार्थ दिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते पराग शहा च्या वास्तव रूपात फिरले. ज्यांनी ज्यांनी त्यांना भीक दिली, ज्यांनी त्यांना फटकारले या सर्वांची भेट घेऊन मी काल भिकारी बनवून तुमच्याकडे आलो होतो असे सांगितले. तेव्हा संबंधितांना धक्का बसला असेलच. ज्यांनी भीक दिली त्यांची त्यांनी परतफेड कशी केली हे त्यांनी सांगितले नाही. ते त्यांनी गोपनीय ठेवले.

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून पराग शहा यांची ओळख आहे. मुंबई महापालिकेची त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा त्यांची संपत्ती पाचशे कोटी रुपये होती. त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्याकडे तितकीच संपत्ती होती. मात्र 2025 ची निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्याकडे तीन हजार तीनशे कोटी रुपये इतकी संपत्ती होती. त्यांचा रियल इस्टेट चा व्यवसाय आहे. 2017 ते 2025 या आठ वर्षात त्यांच्याकडे संपत्ती पाचशे टक्क्यांनी वाढलेली आहे. इतक्या प्रचंड वेगाने त्यांची श्रीमंती वाढलेली दिसते. म्हणजे त्यांनी अफाट व्यवसाय करून बेफात नफा मिळवला. नम्र मुनी यांच्या आवाहनानुसार हे एक दिवसाचा भिकारी बनले. या एका दिवसात समाजातील दाहक वास्तव त्यांना पाहायला मिळाले. एक दिवसांचा भिकारी बनवून त्यांच्यातील अहंकार नष्ट झालेला असेल. त्यांनी येथून पुढची काही वर्षे रियल इस्टेटमध्ये काम करताना एक पैशाचाही नफा मिळवू नये.

स्वस्तातील निवासस्थाने सामान्य माणसाला उपलब्ध करून द्यावीत.भिकाऱ्यांसाठी त्यांनी आयुष्यात कधीही भीक मागू नये म्हणून रोजगार उपलब्ध करून द्यावा. हे एक दिवसात होणार नाही पण त्यांच्याकडून मनात आणले तर एक दिवस नक्की होईल. हे जेव्हा त्यांच्याकडून होईल तेव्हा ते एक चांगला “माणूस” बनलेले असतील. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अगदी आकस्मिकपणे आर्थर रोड तुरुंगात जावे लागले. गृहमंत्री म्हणून काम केलेल्या अनिल देशमुख यांनाही आर्थर रोड मध्ये जावे लागले होते. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अनिल देशमुख यांनी एक पुस्तक लिहिले. संजय राऊत यांनी “नरकातला स्वर्ग”नावाचे पुस्तक लिहिले. पण या दोघांनीही तुरुंगातील कच्च्या आणि पक्क्या बंदी जनाची अवस्था काय असते यावर एक ओळही लिहिली नाही. मात्र विद्यमान आमदार पराग शहा यांनी भिकाऱ्यांचे जग काय असते यावर एक पुस्तक लिहावे. भिकारी ही व्यवस्था मोडीत काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील हे शासनाला सांगावे. (audience) त्यातून भिकाऱ्यांची संख्या पाच दहा टक्के कमी झाली तरी त्याचे श्रेय पराग शहा यांच्याकडे जाईल. नम्रमुनी महाराज यांनाही त्याचा आनंद होईल.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो, ₹२००० खात्यात जमा झाले नाही? इथं करा तक्रार, २४ वा हप्ता होईल लगेच जमा?

हाती पैसा येणार, रखडलेली कामं मार्गी लागणार ५ राशींना मिळणार?

शहरातील डीपी रोड, रिंग रोड खुले करा?