देशातील सर्वात पवित्र तीर्थयात्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अमरनाथ यात्रा आज, २ जुलैपासून सुरू झाली आहे. बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी भाविकांची पहिली तुकडी भगवती नगर यात्री निवास येथून रवाना झाली. जम्मू आणि काश्मीर चे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी हिरवा झेंडा दाखवून यात्रेला शुभारंभ केला. यंदाच्या यात्रेसाठी प्रशासनाने सुरक्षा आणि सोयी-सुविधांवर विशेष भर दिला आहे.

बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी अमरनाथ गुहा ही श्रीनगर शहराच्या ईशान्येला हिमालय पर्वतरांगेत स्थित असून, दरवर्षी येथे नैसर्गिकरित्या बर्फाचे शिवलिंग तयार होते. या स्वयंभू हिमलिंगाला ‘बाबा बर्फानी’ म्हणून ओळखले जाते. या पवित्र दर्शनासाठी देशभरातून आणि परदेशातूनही हजारो भाविक अमरनाथ यात्रेत सहभागी होतात. (Amarnath) यावर्षी ही यात्रा श्रावण पौर्णिमेपर्यंत म्हणजेच २८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत मोठ्या संख्येने भाविक गुहेत जाऊन बाबा बर्फानींचे दर्शन घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सुरक्षा आणि सुविधांसाठी विशेष तयारी अमरनाथ यात्रा ही अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक तीर्थयात्रा मानली जाते. त्यामुळे यात्रेच्या संपूर्ण मार्गावर केंद्रीय निमलष्करी दल, पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांची मोठ्या प्रमाणावर तैनाती करण्यात आली आहे. (Amarnath) यात्रेदरम्यान सातत्याने गस्त, सुरक्षा तपासणी आणि देखरेख ठेवण्यात येणार आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी वैद्यकीय शिबिरे, प्रथमोपचार केंद्रे आणि आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.यात्रा सुरू होण्यापूर्वी लष्कर, विशेष कृती गट , पोलीस, सीआरपीएफ, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि इतर संबंधित यंत्रणांनी संयुक्त प्रात्यक्षिक सराव केला. या सरावाद्वारे आपत्कालीन परिस्थितीत तातडीचा प्रतिसाद, बचावकार्य, स्थलांतर प्रक्रिया आणि दळणवळण यंत्रणेची तयारी तपासण्यात आली. प्रशासनाने भाविकांना अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, यात्रेदरम्यान ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींचं बँक खातं होणार फुल्ल? आता थेट 3000 रुपये?
पुणे-नाशिककरांनो रेल्वे संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी?
WhatsApp वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी महत्त्वाच्या फीचरबाबत केंद्र सरकार अलर्ट?