निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करा, राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयांना शिक्षण विभागाचे आदेश?

राज्यातील अनेक सार्वजनिक विद्यापीठांकडून निकाल वेळेत जाहीर केले जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. उच्य शिक्षण विभागाकडून राज्यातील काही विद्यापीठे आणि उच्य शिक्षण संस्थांना वारंवार सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अखेर विभागाने कठोर भूमिका घेत राज्यातील सर्व सार्वजनिक अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांना ३१ जुलैपर्यंत सर्व प्रलंबित परीक्षा निकाल कोणत्याही परिस्थितीत बाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले असून, निकाल जाहीर होताच त्याची डिजिटल प्रत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर (results) तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगीन आयडीवर तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. २४ जुलै २०२६ रोजी पुणे येथील महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी-२०२०) अंमलबजावणीसह परीक्षा निकालांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. (results) या वेळी अद्यापि काही विद्यापीठांनी निकाल जाहीर न केल्याबद्दल मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, परीक्षा संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत आणि कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे.

निकाल वेळेत जाहीर केले जात नसल्याने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी इच्छित उच्च शिक्षण संस्थेत प्रवेशापासून वंचित राहतात.या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेणे सहज शक्य व्हावे, (results) यासाठी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणे अत्यंत आवश्यक आहे.जाहीर केलेल्या निकालाची ऑनलाइन प्रत विद्याथ्यांना त्वरित विद्यापीठ संकेतस्थळ, विद्यार्थी लॉगीनला उपलब्ध करून द्यावी.निकाल रखडल्याने अनेक विद्यार्थ्यांपुढे अनेक प्रत्र निर्माण होतात. यामुळे राज्यात यापुढे कोणत्याही स्थितीत निकाल वेळेत न लावणाऱ्या विद्यापीठ, संस्थांनी योग्य खबरदारी घ्यावी, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिले आहेत.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?