शिंदेंनी उठाव केला नसता तर शिंदेसेनेच्या आमदाराने भाजपला आरसाच दाखवला, मोठा दावा करत म्हणाले?

एकनाथ शिंदेंनी उठाव केला म्हणून भाजप सत्तेत आला आहे, असा चंद्रकांत रघुवंशींना दावा केला आहे. या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

महाराष्ट्रातील राजकारण दिवसेंदिवस तापलेलं दिसून येत आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका आमदाराने खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधत मोठं वक्तव्य केलं आहे. (political) यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदेंनी भापजला जिवंत केलं असल्याचं ते म्हणाले आहे. यानंतर त्यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे. शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, भाजपला जिवंतच एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. नाहीतर भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न राहिला नसता. महाविकास आघाडीच्या काळात भाजप सत्तेत कुठे होता? एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतरच भाजप सत्तेत आला, असा दावा चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.

चंद्रकांत रघुवंशी यांनी विजयकुमार गावितांवरही टीका केली आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यामुळेच डॉ. विजयकुमार गावित यांनाही मंत्रिपद मिळालं आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच डॉ. विजयकुमार गावित यांची लॉटरी लागली. (political) गावितसाहेब अडीच वर्षे आदिवासी विकास मंत्री राहिले आहेत, असं म्हणत रघुवंशी यांनी गावितांवर निशाणा साधला आहे.

भाजपच्या सत्तेपासून ते गावितांच्या मंत्रि‍पदापर्यंत चंद्रकांतरघुवंशींच्या या वक्तव्याने नंदुरबारच्या राजकारणात नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. रघुवंशींच्या वक्तव्यावर भाजपकडून काय प्रत्युत्तर येतं? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये भाजपबद्दल हे विधान केलं आहे. (political) यामुळे आता राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे.

हेही वाचा : 

बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक दावा, थेट स्क्रीनशॉट शेअर करून नवा आरोप काय?

 केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी पगारवाढ?