मोठी घसरण सोन्याचा भाव धडाम, आज 10 ग्रॅमसाठी?

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या दरात आज मोठी झाली आहे. (increasing) आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर होत असून, या मौल्यवान धातूंच्या किमतीत दररोज चढ-उतार पाहायला मिळत आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदीला विशेष महत्त्व असल्याने दर कमी होताच खरेदीदारांचे लक्ष सराफ बाजाराकडे लागले आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात तब्बल २ हजार ५०० रुपयांची घसरण झाली आहे. (increasing) त्याचबरोबर चांदीच्या दरातही मोठी घट झाली असून, एक किलो चांदी तब्बल ४ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. इतर दिवसांच्या तुलनेत आज झालेली ही घसरण लक्षणीय मानली जात आहे.

दर घसरल्यानंतर जळगावमध्ये आज १० ग्रॅम सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ५३ हजार ४७० रुपयांवर पोहोचला आहे. तर एक किलो चांदीचा दर जीएसटीसह २ लाख ३४ हजार ८४० रुपयांवर आला आहे. (increasing) त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या वाढत्या दरामुळे खरेदीचा निर्णय पुढे ढकलणाऱ्या ग्राहकांना आजच्या घसरणीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीनुसार पुढील काळात या दरांमध्ये पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक दावा, थेट स्क्रीनशॉट शेअर करून नवा आरोप काय?

 केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी पगारवाढ?