शेतकऱ्यांच्या खात्यावर आणखी २ हजार जमा होणार, तारीखही ठरली

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आणखी दोन हजार रूपयांच्या मदतीचा दुसरा हप्ता राज्य सरकारकडून जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दुसऱ्या हप्त्यातील मदतीचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांतील एक कोटी पात्र बाधित शेतकऱी आहेत. त्यांच्या बँक खात्यांवर डिसेंबर महिन्यात दुसरा हप्ता जमा केला जाणार आहे. दिवाळीपूर्वी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा झाली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या मदत निकषांत वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारला सुधारीत प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.एल निनोच्या प्रभामुळे यंदा राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस कमी असल्यामुळे पिके करपली, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. (farmers) त्यामुळे राज्य सरकार बळीराजाच्या मदतीला धावून आले आहे. दिवाळीच्या आधी राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी आणि नोंदणी कऱण्यात आली. राज्यात आतापर्यंत ३०४ दुष्काळी तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. पण राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना आणखी १० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे.

आधीच पावसाच्या तुटीमुळे शेतकरी संकटात सापडले असून, पिकांचं नुकसान आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. या सर्व तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जात आहे. दिवाळीच्या आधी ५ हजार रूपयांची अग्रीम मदत सरकारकडून करण्यात आली होती.(farmers) त्यानंतर आता २ हजार रूपयांचा दुसरा हप्ता जमा केला जाणार आहे. डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्याआधीच सरकारकडून दुसरा हप्ता जमा केला जाणार आहे. त्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रूपयांची मदत दिली जाण्याची शक्यता सरकारी सूत्रांनी वर्तवली आहे.

महाराष्ट्रात १ कोटी ७१ लाख शेतकरी आहेत. (farmers) त्यापैकी १ कोटी ३१ लाख बळीराजाकडे शेतकरी ओळख क्रमांक आहे. दुष्काळी तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांची संख्या १ कोटी १० लाख आहे. राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांना दिवाळीच्या आदी ५ हजारांची मदत मिळाला आहे. उर्वरीत १० लाख शेतकऱ्यांनी ई- केवायसी पूर्ण करताच मदत जमा होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. शेतकरी ओळख क्रमांक काढलेला नसणे, सामाईक शेत जमीन असणे, मृतांच्या वारसांनी आपली नावे महसूल दप्तरी नोंद न करणे आदी कारणांमुळे ही मदत जमा झालेली नाही. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २ हजार रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची घोषणा सरकारकडून होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल.

हेही वाचा : 

मोठी बातमी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, मनसेत मोठा पक्षप्रवेश, मुंबईत घडामोडींना वेग

अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची गर्दी

हुपरीमध्ये आगीत तीन घरे भस्मसात