नोव्हेंबर महिना सण-उत्सव आणि सुट्ट्यांनी भरलेला आहे. दिवाळी, गोवर्धन पूजा, भाऊबीज या सणांसोबत वेगवेगळ्या सणांमुळे देशातल्या अनेक राज्यांमध्ये बँका वेगवेगळ्या दिवशी बंद राहणार आहेत. (holidays) त्यामुळे बँकेत चेक जमा करणे, पैसे काढणे किंवा इतर महत्त्वाची कामं करायची असतील, तर आधीच सुट्ट्यांची यादी तपासणं गरजेचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नोव्हेंबर २०२६ च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, ८ नोव्हेंबरपासून अनेक राज्यांमध्ये बँकांचं कामकाज प्रभावित होणार आहे.

८ ते ११ नोव्हेंबरदरम्यान कुठे बँका बंद :
८ नोव्हेंबर (रविवार)- देशभरातल्या सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
९ नोव्हेंबर (सोमवार)- त्रिपुरा, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बँका बंद राहतील.
१० नोव्हेंबर (मंगळवार) – गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये दिवाळी, बलिप्रतिपदा आणि गोवर्धन पूजेनिमित्त बँकांना सुट्टी असेल.
११ नोव्हेंबर (बुधवार) – सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.(holidays) या दिवशी भाऊबीज आणि इतर सणांनिमित्त सुट्टी असेल.
नोव्हेंबरमधील पुढील बँक सुट्ट्या :
१६ नोव्हेंबर – बिहार आणि झारखंड
२० नोव्हेंबर – उत्तराखंड
२२ नोव्हेंबर – देशभरात रविवारची सुट्टी
२३ नोव्हेंबर – मेघालय
२४ नोव्हेंबर – मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, तेलंगणा, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, नागालँड, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड आणि हिमाचल प्रदेश
२७ नोव्हेंबर – कर्नाटक
२८ नोव्हेंबर – देशभरात चौथा शनिवार
२९ नोव्हेंबर – देशभरात रविवारची सुट्टी
बँका बंद असल्या तरी ऑनलाइन व्यवहार सुरू बँकांच्या शाखांना सुट्टी असली तरी ग्राहकांना पैशांच्या व्यवहारांसाठी अडचण येणार नाही. मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करता येतील. (holidays) तसेच ATM मधून रोख रक्कम काढण्याची सुविधाही मिळेल. पण चेक क्लिअरन्स, डिमांड ड्राफ्ट आणि बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष जाऊन करावी लागणारी कामं सुट्ट्यांमुळे रखडू शकतात. त्यामुळे बँकेशी संबंधित महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण करून घ्या. सुट्ट्यांचे नियम राज्यानुसार आणि बँकेनुसार बदलू शकतात. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेची अधिकृत सुट्टी यादी तपासा.
हेही वाचा :
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ कुठे घेतला निर्णय