दिवाळी आणि सणासुदीच्या काळात दूध, पनीर, खवा आणि मिठाईची मागणी वाढते. मात्र, या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असल्याने खरेदी करताना सावध राहणे गरजेचे आहे. भेसळयुक्त पदार्थ कसे ओळखायचे आणि खरेदीपूर्वी कोणत्या गोष्टी तपासायच्या, (adulteration) याच्या काही सोप्या टिप्स जाणून घ्या.

सणासुदीच्या काळात बाजारात मिठाई, खवा, दूध, तूप आणि पनीरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. दिवाळीच्या निमित्ताने अनेक जण घरी वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी तसेच पाहुण्यांच्या स्वागतासाठी या वस्तूंची खरेदी करतात. मात्र, वाढत्या मागणीचा फायदा घेत काही विक्रेते पदार्थांमध्ये भेसळ करू शकतात. असे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. (adulteration) त्यामुळे कोणताही पदार्थ खरेदी करताना त्याचा रंग, वास आणि दर्जा तपासणे गरजेचे आहे. काही सोप्या पद्धतींच्या मदतीने पदार्थां मधील भेसळीचा प्राथमिक अंदाज घेता येतो. पदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी या सोप्या ट्रिक्स मदत करतील.
पनीर
दिवाळीत भाजी, स्नॅक्स आणि इतर पदार्थ बनवण्यासाठी पनीरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, बाजारातून पनीर खरेदी करताना त्याचा रंग, वास आणि टेक्सचर तपासून घ्या. पनीरमध्ये स्टार्चची भेसळ आहे का, हे पाहण्यासाठी त्याचा थोडा भाग पाण्यात उकळून थंड करा. त्यानंतर त्यामध्ये आयोडीन सोल्युशनचे २-३ थेंब टाका. मिश्रणाचा रंग निळा झाल्यास त्यात स्टार्च असण्याची शक्यता असते.
दूध
दुधात पाणी किंवा डिटर्जंटसारख्या पदार्थांची भेसळ केली जाऊ शकते. दुधात पाणी मिसळले आहे का, हे पाहण्यासाठी गुळगुळीत आणि किंचित तिरक्या पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाका. शुद्ध दूध हळूहळू खाली वाहते आणि पांढरा माग सोडते. पाणी मिसळलेले दूध लगेच वाहून जाते. तसेच, थोडे दूध आणि तेवढेच पाणी एकत्र करून हलवा. त्यातून खूप जास्त आणि दाट फेस तयार झाल्यास डिटर्जंटची भेसळ असण्याची शक्यता असते.
मिठाई आणि खवा
मिठाई खरेदी करताना तिचा रंग आणि सुगंध आवर्जून तपासा. अतिशय भडक रंगाची किंवा विचित्र वास येणारी मिठाई खरेदी करणे टाळा. खव्याची गुणवत्ता तपासण्यासाठी तो हातावर हलक्या हाताने चोळून पाहा. चांगला खवा मऊ आणि किंचित दाणेदार असतो, तर भेसळयुक्त खवा रबरी किंवा चिकट वाटू शकतो. खवा किंवा खव्यापासून बनवलेल्या मिठाईमध्ये स्टार्च आहे का, हे पाहण्यासाठी थोडासा पदार्थ पाण्यात उकळून थंड करा. त्यात आयोडीन सोल्युशनचे काही थेंब टाका. निळा रंग तयार झाल्यास स्टार्चची भेसळ असण्याची शक्यता असते.
तूप
दिवाळीत फराळ आणि मिठाई तयार करण्यासाठी तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. (adulteration) त्यामुळे तूप खरेदी करताना त्याचा वास आणि दर्जा तपासा. तुपामध्ये स्टार्चसारख्या पदार्थांची भेसळ आहे का, हे पाहण्यासाठी अर्धा चमचा तूप एका पारदर्शक भांड्यात घ्या. त्यात आयोडीन सोल्युशनचे २-३ थेंब टाका. मिश्रण निळे झाल्यास त्यात स्टार्चची भेसळ असण्याची शक्यता असते.
हेही वाचा :
मारहाण करून एकाचे अपहरण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
संजय गायकवाड गोत्यात मोठी कारवाई होणार एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश
अहान शेट्टीच्या ‘सनकी’ या अॅक्शन ड्रामाच्या शूटिंगला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात