‘भविष्यात काय होईल सांगता येत नाही’ उद्धव ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर संजय राऊतांचं मोठं विधान

महाराष्ट्राच्या हास्यरेषा पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले. या भेटीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना ‘भविष्यात काय होईल सांगता येत नाही’ असं सूचक विधान केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या प्रशांत कुलकर्णी संपादित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात तिन्ही नेते एकत्र आले होते. (meeting) आता या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय चर्चांना आणखी रंग चढला आहे.

या भेटीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “काल उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र होते ना, हा ओलावा असतो. भविष्यात काय होईल सांगता येत नाही.” त्यांनी पुढे लोकशाहीतील बदलत्या राजकीय परिस्थितीचाही उल्लेख केला. “लोकांचे मन चंचल आहे. लोकशाही म्हणजे बदल आणि परिवर्तन आहे. सत्तेवर कायम कुणी राहू शकत नाही,” असं राऊत म्हणाले. या विधानामुळे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळी समीकरणं तयार होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

भाजपमध्ये आशिष शेलार यांच्याबाबत राऊतांचं वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांच्याबाबतही संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. “मी आणि शेलार दोघे बाजूला बसलेलो आहोत आणि प्रेमाने बोलत आहोत. भाजपमध्ये ज्यांच्या मांडला मांडी लावून बसावे असे आशिष शेलार आहेत,” असं ते म्हणाले. (meeting) तसेच, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांबाबत आणि राजकारणातील सूडाच्या भावनेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सूडाच्या राजकारणावरून संजय राऊतांचा निशाणा “कुणावरही सुडाने कारवाई होऊ नये असे सांगणारे बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी होते,” असं राऊत म्हणाले. वसई-विरारमधील राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, “मी स्वतः अनेक वर्ष राजकारणात आहे. वसई- विरारचा कालखंड मी जवळून पाहिला आहे. (meeting) मला जेव्हा सत्य समजले तेव्हा पासून मी आप्पाच्या पाठीशी उभा राहिलो.” या कार्यक्रमातील संवाद आणि त्यानंतरच्या संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेमुळे महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना नवा विषय मिळाला आहे.

हेही वाचा : 

मारहाण करून एकाचे अपहरण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

संजय गायकवाड गोत्यात मोठी कारवाई होणार एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश

अहान शेट्टीच्या ‘सनकी’ या अ‍ॅक्शन ड्रामाच्या शूटिंगला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात