सणासुदीतच ग्राहकांना मोठा झटका, तुमचा गॅस सिलेंडर किती महागला पटापट किंमत जाणून घ्या

ऐन सणासुदीतच ग्राहकांना मोठा झटका बसला. (gas cylinder) त्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. आज 1 ऑक्टोबर रोजी तेल कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर केले आहे. काय आहेत आता किंमत

देशात सण-उत्सवाचे वातावरण आहे. सणासुदीची धामधूम सुरू झाली आहे. (gas cylinder) त्यातच आज तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना महागाईची झळ बसली. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली. मुंबईत व्यावसायिक गॅसची किंमत 2,701 रुपये होती. आता 63 रुपयांनी महाग होऊन गॅसची किंमत 2764 रुपये इतकी झाली आहे. तर घरगुती गॅसची किंमत 941.5 रुपयांवर स्थिर आहे. लेहपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून ते पूर्वोत्तर राज्यापर्यंत 19 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. तर हॉटेलिंग आणि फराळ महागण्याची शक्यता आहे.

इंडियन ऑईलने नवीन दर जाहीर केले. (gas cylinder) त्यानुसार दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडर आजपासून 62.50 रुपयांपासून महागला. दिल्लीत 19 किलो व्यावसायिक सिलेंडर गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये 9.50 रुपयांनी महागला. व्यावसायिक गॅस सिलेंडर 2747.50 रुपयांवर पोहचला. चेन्नईमध्ये सिलेंडर आता 2983 रुपये इतका झाला आहे. सप्टेंबरमध्ये ही किंमत 2916.50 रुपये इतकी होती. तर घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 957.5 रुपये इतकी आहे. लेहमध्ये गॅस सिलेंडर सर्वाधिक महाग आहे. येथे घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1179 रुपये इतकी आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेडर आता 3385.5 रुपयांऐवजी 3450 रूपयांना मिळत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 64.50 रुपयांची वाढ झाली आहे. केंद्र सरकार पात्र ग्राहकांच्या बँक खात्यात थेट LPG सबसिडी जमा करते. सध्या PMUY ग्राहकांसाठी केंद्र सरकारने 300 रुपये प्रति 14.2 किलो सिलेंडरपर्यंत, वर्षात 12 रिफिलवर सबसिडी देण्याची तरतूद केली आहे. इंडियन ऑईलनुसार, LPG किंमत वाढ अथवा कमी होण्याचा परिणाम लागलीच दिसतो. किंमती निश्चित करण्यासाठी जागतिक LPG भाव बेंचमार्क म्हणून वापरल्या जातात. OMCs गेल्या महिन्याच्या सरासरी बेंचमार्क अथवा परदेशी चलन विनिमय दराच्या आधारे किंमत निश्चित करते. आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.

हेही वाचा : 

बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती

शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी

धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार