नीट यूजी परीक्षा वर्षातून २ ते ३ वेळा घेण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर २१ जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी एनटीएने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणाऱ्या नीट यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेबाबत सध्या देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. ही परीक्षा वर्षातून दोन किंवा तीन वेळा घेतली जावी अशी महत्त्वपूर्ण शिफारस आरोग्य आणि कुटुंब कल्याण विषयक संसदीय स्थायी समितीने केली आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि त्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी ही शिफारस करण्यात आल्याचे बोललं जात आहे. (exam) मात्र अद्याप यावर कोणताही शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही.
अधिकारी तिसऱ्यांदा संसदीय समितीसमोर हजर एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात झालेल्या नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या गंभीर आरोपांनंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यातील नियोजनासाठी गेल्या (exam) काही आठवड्यांत सरकारी अधिकारी तिसऱ्यांदा संसदीय समितीसमोर हजर झाले. या महत्त्वपूर्ण बैठकीत राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह, उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष अभिजात सी. सेठ यांनी समितीसमोर आपली बाजू मांडली. संसदीय समितीच्या सदस्यांनी या अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत झालेल्या तपासाचा आणि पुढील उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.
समितीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपरफुटीची समस्या ही आता केवळ एक वेळची घटना राहिलेली नाही, तर ती एक दीर्घकालीन समस्या बनत चालली आहे. ही घटना २०२४ मध्ये आणि पुन्हा २०२६ मध्ये घडल्यामुळे यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गोंधळाला जबाबदार कोण? उत्तरदायित्व कसे निश्चित करणार? आणि भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी सध्याची शिक्षा पुरेशी आहे का? असे सवाल सातत्याने उपस्थित होत आहेत. त्यातच दुसऱ्या कोणाच्या तरी चुकीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणे अत्यंत क्लेशदायक आहे, म्हणूनच परीक्षा एकापेक्षा जास्त वेळा घेण्याचा पर्याय समोर आला आहे.
यापूर्वीही झाली होती घोषणा, पण अंमलबजावणी नाही नीट परीक्षा वर्षातून अनेक वेळा घेण्याची मागणी नवीन नाही. यापूर्वी २०१८ मध्ये तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एनटीएमार्फत जेईई आणि नीट या दोन्ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, अशी घोषणा केली होती. मात्र, त्याची कधीही अंमलबजावणी झाली नाही. (exam) त्यानंतर २०२३ मध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने म्हटले होते की, एमबीबीएसच्या सर्व जागा एकाच समुपदेशन प्रक्रियेद्वारे भरल्या जात असल्याने, परीक्षा वर्षातून दोनदा घेणे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार नाही. परंतु, आताच्या गंभीर परिस्थितीनंतर या निर्णयावर पुन्हा एकदा गांभीर्याने विचार सुरु असल्याचे बोललं जात आहे.
२१ जून रोजी होणार फेरपरीक्षा दरम्यान, मे महिन्यात रद्द झालेली नीट यूजी परीक्षा आता २१ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात आली आहे. ही भारतातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा असल्याने, यावेळी पेपरफुटीला किंवा कोणत्याही गैरप्रकाराला थोडाही वाव राहणार नाही, याची खात्री सरकारने आणि एनटीएने केली आहे. यासाठी परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा आणि विस्तृत व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
हेही वाचा :
तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी