ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा महत्त्वाचा निर्णय

ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनाा दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकारने दिवाळीत शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिली आता शेतकऱ्यांना आणखी मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहेत. (Farmers) त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. यादरम्यान सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी मोठा निर्णय घेतला आहे.

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी एक महिन्याचे वेतन दुष्काळग्रस्तांना देण्याचे जाहीर केले आहे. (Farmers) त्यानंतर सर्व आमदारांच्या वतीने सुनेत्रा पवारांनी धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पहिला पुढाकार घेतला. बैठकीत घेतलेल्याा निर्णयानुसार सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम देण्याचा निर्णय घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय.

‘शेतकरी बांधवांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देणे, हीच अजितदादांनी आपल्याला दिलेली खरी शिकवण आहे. दादांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेत, शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी योगदान देणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शेतकरी बांधवांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहणे, हाच यामागचा प्रामाणिक भाव आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी स्पष्ट केले.

शिंदे गटही मदतीला धावला शिंदे गटानेही शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे जाहीर केले. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांच्या मागे शिवसेना उभी आहे. आम्ही त्यांना काही कमी पडू देणार नाही. शेतकऱ्यांवर संकट मोठं आहे. (Farmers) जिथे संकट, तिथे शिवसेना उभी असते, ही बाळासाहेब, आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेण्याचे काम शिवसैनिक करताहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त इतकंच सांगतो की, सर्व कार्यकर्ते, मंत्री, खासदार, आमदारांनी ज्या ठिकाणी शेतकरी संकटात आहे, दुष्काळात आहे, त्या ठिकाणी मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्‍यांनी केले.

हेही वाचा : 

मोठी बातमी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, मनसेत मोठा पक्षप्रवेश, मुंबईत घडामोडींना वेग

अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची गर्दी

हुपरीमध्ये आगीत तीन घरे भस्मसात