NEET 2026 विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा!

वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांनी NEET (UG) 2026 परीक्षेसंदर्भात काही महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. परीक्षेचा कालावधी वाढवण्यासोबतच रफ वर्कसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून (students) त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अधिक सोयीस्कर वातावरण मिळणार आहे.

NEET (UG) 2026 परीक्षा 21 जून रोजी देशभरातील विविध केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. नव्या नियमांनुसार परीक्षा दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 5:15 वाजेपर्यंत चालणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एकूण 195 मिनिटांचा कालावधी उपलब्ध होणार आहे. वाढीव वेळेमुळे प्रश्नपत्रिकेचे बारकाईने वाचन, उत्तरांचे अचूक नियोजन आणि वेळेचे प्रभावी व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होणार आहे.राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांकडून सातत्याने मिळणाऱ्या सूचना आणि अनुभवांचा अभ्यास करून हे बदल करण्यात आले आहेत. परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विद्यार्थीहिताची बनवण्याच्या उद्देशाने नव्या पद्धतीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. (students) त्यामुळे परीक्षेतील गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सोयीचाही विचार करण्यात आला आहे.

परीक्षेतील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे प्रश्नपत्रिका बुकलेटमध्ये रफ वर्कसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेषतः फिजिक्स आणि केमिस्ट्री यांसारख्या विषयांमध्ये गणना करताना विद्यार्थ्यांना अतिरिक्त जागेची आवश्यकता भासते. यापूर्वी मर्यादित जागेमुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या निर्णयामुळे गणिती प्रक्रिया अधिक व्यवस्थितपणे मांडता येणार आहे.एजन्सीच्या माहितीनुसार, वाढवण्यात आलेल्या एकूण वेळेमध्ये उपस्थिती नोंदणी, बायोमेट्रिक पडताळणी आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी लागणारा वेळही विचारात घेण्यात आला आहे. (students) त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रश्न सोडवण्यासाठी अधिक प्रभावी वेळ मिळेल. गेल्या काही वर्षांत परीक्षेच्या व्यवस्थापन आणि पारदर्शकतेबाबत विविध स्तरांवर सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर करण्यात आलेल्या या सुधारणांमुळे NEET (UG) 2026 परीक्षा अधिक संतुलित, सोपी आणि विद्यार्थी-केंद्रित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा मुंबईपर्यंत धावणार?

तलावात बुडून माय-लेकीचा मृत्यू

सोनसाखळी चोरणारे चौघे जेरबंद