नागपूर विभागातील कोहळेंचा पराभव हा भाजपच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आहे. या पराभवावरून नेत्यांकडून प्रदेश पदाधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली आहे.

राज्यात पाच जागांवर झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 3 जागा जिंकल्या. तर 2 जागांवर महायुती जिंकली. संघाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नागपुरातही काँग्रेसने भाजपला धूळ चारली. नागपुरात काँग्रेसच्या अभिजीत वंजारींनी भाजपच्या सुधाकर कोहळेंना पराभूत केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन्ही दिग्गज प्रचारासाठी मैदानात उतरल्यानंतरही भाजपचा पराभव झाला. (BJP) त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भरोशावर आणखी किती प्रचार चालणार, अशी विचारणा प्रदेश पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे नागपूरमधील पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नागपूर विभागात महायुतीचे 31 आमदार आहेत. तरी पदवीधर मतदारसंघात पराभव का? असा सवाल नागपूर विभागातील प्रदेश पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आलाय. नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचा सलग दुसरा पराभव झाला आहे. 6 जिल्ह्यांत महायुतीचे ३१ आमदार असतानाही पराभव का झाला, (BJP) अशी विचारणा प्रदेश पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच भरोशावर प्रचार किती दिवस चालणार, असा सवालही उपस्थित करण्यात आल्याची माहिती आहे.
नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांचा पदवीधर मतदारसंघात समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये विधानसभेचे ३२ आमदार असून, त्यापैकी २६ आमदार महायुतीचे आहेत. एकट्या भाजपचे २१ आमदार आहेत. विधानपरिषदेचे 5 सदस्य आणि राज्यसभेचे 2 खासदार असे राजकीय पाठबळही महायुतीकडे आहे. एवढे संख्याबळ असूनही महायुतीची ताकद मतांमध्ये का उतरली नाही, (BJP) याचा वरिष्ठ स्तरावरून आढावा घेतला जाणार आहे. स्थानिक आमदारांनी पदवीधर मतदारांपर्यंत किती संपर्क साधला आणि मतदानासाठी किती प्रयत्न केले, याची तपासणी होणार आहे. मतदार नोंदणी, स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या आणि प्रत्यक्ष मतदानाचे नियोजन यांचाही आढावा घेतला जाणार आहे.महायुतीतील घटकपक्षांमध्ये प्रचारादरम्यान किती समन्वय होता, याचीही चाचपणी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि बावनकुळे यांच्या सभांवर प्रचार अधिक अवलंबून राहिल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरू असल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा :
कांदा खरेदी करताना या चुका टाळा अन्यथा पैशांचं होईल मोठं नुकसान
गुड न्यूज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर