कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
एकमेकाबद्दल मनात राग ठेवून आम्ही एक आहोत असे निर्माण केलेले चित्र किती फसवे असते, किती आभासी असते, (reflection) याचे यथार्थ दर्शन विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने उभ्या महाराष्ट्राला महायुती मधील घटक पक्षांनी घडवले आहे. पाच पैकी तीन जागा महाविकास आघाडीने जिंकल्यावर महायुतीमध्ये पराभवाचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे. भाजपला तर घरचाच आहेर मिळू लागला आहे. आता पराभवाची कारणे शोधताना महायुतीला आत्मचिंतनही करावे लागेल.

पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये एकेकाळी भाजपचे वर्चस्व होते. भाजपने या मतदारसंघातून चार वेळा विजय मिळवला होता. नंतर काँग्रेसचे माणिकराव पाटील चुयेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे भैय्यासाहेब माने, सूर्यकांत पाटील यांनी या मतदारसंघाच्या बांधणीवर काम केले होते. या मंडळींनी भाजपच्या स्मिता जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला होता. ही मंडळी प्रत्यक्ष प्रचारात उतरतील, भाजपच्या विजयासाठी प्रयत्न करतील असे वातावरण होते. भाजपला सुद्धा इथे यश मिळेल याची खात्री होती पण दोन मोठ्या घराण्यांचा वारसा लावलेल्या स्मिता जाधव यांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव भाजपासाठी डोक्यात झिणझिण्या अण्णा राठोड. कारण ही जागा भाजपला मिळणारच असे गृहीत धरून कोणीच कष्ट मात्र घेतले नाहीत.
तीन पदवीधर मतदारसंघ आणि दोन शिक्षक मतदार संघ अशा एकूण पाच मतदारसंघांमध्ये विधान परिषदेची ही निवडणूक झाली. मतदान प्रक्रियेत राज्यातील 23 जिल्हे सहभागी होते. मतदार सुशिक्षित होते. पण मतदान पत्रिका मोठ्या संख्येने अवैध ठरल्या. (reflection) त्याचा कुणाला फटका बसला तर कुणाला फायदा झाला. मतदान कसे करायचे याचीच पुरेशी माहिती नसल्यामुळे मतपत्रिका बाद ठरण्याचे प्रमाण वाढलेले दिसले. पाच पैकी एक भाजप,एक शिंदे यांची शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि एक राष्ट्रीय काँग्रेसला जागा मिळाली. अर्थात महाविकास आघाडीचे या निवडणुकीत पारडे जड ठरले.
पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण न करताच भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिंदे यांच्या शिवसेनेवर, तर शिंदे शिवसेनेचे धंगेकर यांनी भाजपवर पराभवाचे खापर फोडले आहे. भाजपचे आणखी एक प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी तर भाजपने या पराभवाचे आत्मचिंतनच केले पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त करून घरचा आहेर दिला आहे. आधी जागा वाटपावरून धुसफुस, नंतर मैत्रीपूर्ण लढतीची भाषा असे काही प्रकार महायुतीमध्ये घडले. महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांनी आम्ही एक आहोत असे चित्र दाखवण्याचा आटापिटा केला मात्र तिथे “वरुन कीर्तन आतून तमाशा” सुरू होता. पुणे शिक्षक मतदार संघात भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी सानप यांना उमेदवारी देऊन त्यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले होते.
या निवडणुकीत शरद पवार यांनी दोन जागा जिंकून महाविकास आघाडी मधील आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. हर्षदा देशमुख जाधव यांच्या विजयासाठी त्यांनी चांगले डावपेच आखले होते. या निवडणुकीत महायुतीला मतदारांनीच जमिनीवर आणले आहे. (reflection) तथापि विधानपरिषदांचा कौल हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आहे असे म्हणता येणार नाही मात्र बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली तर महाविकास आघाडीचा फायदा होतो असा दावा संजय राऊत वगैरे यांच्याकडून केला जाऊ शकतो. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की, जिथे पसंती क्रमाने मतदान करावयाचे असते तेथे मतदान यंत्रांचा उपयोग नसतो. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या निवडणुकीत मतदारांनी नाकारलेले आहे. पण याच पक्षाचे प्रवक्ते असलेल्या खासदार संजय राऊत यांना आनंदाच्या उकळ्या नक्कीच उठल्या असतील.
पण आपला उमेदवार दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पायरीवर का गेला याचे आत्मचिंतन मात्र त्यांच्याकडून केले जाणार नाही. भाजप विरोधी करण्यात आलेल्या देशभरातील आंदोलनाचा हा परिपाक आहे असे म्हटले जाईल पण त्याचबरोबर देशभरात काँग्रेसला महाराष्ट्राचा अपवाद वगळता कुठेही विजय मिळवता आलेला नाही हे सुद्धा वास्तव आहे.विधान परिषदेच्या या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी जोरदार भाषणे केली मात्र पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदार संघातील मतदारांना आपल्याकडे खेचता आले नाही. कारण नेत्यांनी इथे त्यांच्या कार्यकर्त्यांना कार्यप्रवण केले नाही. त्याचा फटका बसला आहे. महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांनी आपण मनापासून एकत्र आलो नाही आणि म्हणून आपला पराभव झाला असे जाहीरपणे मान्य केले पाहिजे.
हेही वाचा :
कांदा खरेदी करताना या चुका टाळा अन्यथा पैशांचं होईल मोठं नुकसान
गुड न्यूज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर