‘कॅरीऑन’ विद्यार्थ्यांची ४ ऑगस्टपासून परीक्षा आजपासून अर्ज भरता येणार?

कॅरीऑन मिळालेल्या (विशेष प्रवेश संधी) विद्यार्थ्यांसाठी ४ ऑगस्टपासून परीक्षा घेण्यात येणार असून त्याकरिता परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्रक बुधवारी शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने जाहीर केले. (examination) त्यानुसार या विद्यार्थ्यांना आजपासून अर्ज भरता येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने याबाबत दिलेल्या आदेशाने कोल्हापूर, सांगली व सातारा या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील २७ अभ्यासक्रमांतील ३ हजार १४६ विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., एम.बी.ए., विधी आदी २७ अभ्यासक्रमांच्या कॅरीऑन मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी काहींनी सर्किट बेंचमध्ये धाव घेतली होती. त्यावर मंगळवारी आदेश देताना न्यायालयाने या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी दिली. विद्यापीठ आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाने विद्यार्थ्यांसाठी या परीक्षांचे फेरनियोजित करण्याचे आदेश दिले. (examination) यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार असून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या अंतरिम आदेशानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेश संधी (कॅरी ऑन) अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांची उन्हाळी सत्राची २०२६ पूर्वपरीक्षा खास बाब म्हणून घेण्याबाबत तसेच ती एकदाच घ्यावी असा निर्णय विद्यापीठाच्या विद्या परिषदेने घेतला. या परीक्षेसाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करून प्रतिविद्यार्थी दोन हजार पाचशे रुपये इतके परीक्षा शुल्क आकारावे. ही परीक्षा विद्यापीठातर्फे घ्यावी तसेच पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचे मूल्यमापन विद्यापीठात करावे, असा निर्णय परिषेदने घेतला.

या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी विद्यापीठ प्रशासनाने या परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर केले. तसे पत्र कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षण संस्थेचे संचालक, विद्यापीठातील अधिविभागप्रमुखांना बुधवारी (दि. २२) देण्यात आले. (examination) त्यानुसार दि. २३ ते दि. २७ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. दि. २७ रोजी महाविद्यालय, अधिविभाग यांना परीक्षा शुल्क जमा करावे लागणार आहे. दि. २८ रोजी परीक्षा अर्जाच्या याद्या जमा कराव्या लागणार आहेत.

हेही वाचा :

हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया?

पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार?

या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार?