सांगलीत कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

सांगली-मिरज रस्त्यावरील एका हॉटेलसमोर भरधाव मोटारीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

मिथीन बाळकृष्ण पोळ (वय ५६, रा. शंभर फुटी रोड, विकास चौक, सांगली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. (Sangli) या प्रकरणी त्यांचा मुलगा ओम पोळ याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात मोटारचालक तेजस बाहुबली कलशेट्टी (वय ३७, रा. धामणी रोड, विश्रामबाग) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथीन पोळ हे सायकलवरून सांगली-मिरज रस्त्याने पुष्पराज चौक ते मार्केट यार्डच्या दिशेने जात होते. याच (Sangli) दरम्यान पाठीमागून येणाऱ्या आलिशान मोटारीच्या (क्र. एमएच १० डीएच १००८) चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी अतिवेगात चालवली. या भरधाव मोटारीने पोळ यांच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे पोळ यांचा मृत्यू झाला. विश्रामबाग पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी

SBI वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा