लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तारीख आली

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या १२ ते १५ जून दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार मोनिका राजळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. या हप्त्यासाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (‘Ladki Bahin’) दरम्यान राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष मे महिन्याचा हप्ता कधी खात्यात येणार याकडे लागले आहे.

भाजपच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनीही यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. (‘Ladki Bahin’) त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लाभार्थी महिलांच्या खात्यात मे महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता लवकरच जमा होणार असल्याचे सांगितले.राजळे यांनी केलेल्या पोस्टनुसार, १२ ते १५ जून दरम्यान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाऊ शकते. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाला मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय १० जून रोजी जारी करण्यात आला.

मोनिका राजळे यांच्या या घोषणेमुळे लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अनेक महिलांनी यापूर्वी हप्ता जमा होण्यास झालेल्या विलंबाबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र आता निधी मंजूर झाल्याने आणि संभाव्य तारखा समोर आल्याने लाभार्थींना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.(‘Ladki Bahin’) दरम्यान अपात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नसून त्यांच्या खात्यात मे महिन्याचा कोणताही हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

हेही वाचा :

तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी

SBI वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा