लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी; चार महिन्यांचे थकीत पैसे एकरकमी मिळण्याची शक्यता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काही पात्र महिलांना गेल्या चार महिन्यांपासून अनुदानाची रक्कम मिळालेली नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आता अशा महिलांसाठी दिलासादायक माहिती समोर येत असून, थकीत रक्कम एकरकमी जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (accounts) मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी ते मे या कालावधीतील अनुदान न मिळालेल्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण 6 हजार रुपये जमा केले जाऊ शकतात. योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करूनही काही महिलांना अनुदानाचा लाभ मिळालेला नाही.
राज्यात ई-केवायसी पडताळणीनंतर अनेक लाभार्थी महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. (accounts) त्याचवेळी काही पात्र महिलांना तांत्रिक अथवा प्रशासकीय कारणांमुळे अनुदानाची रक्कम वेळेत मिळालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा महिलांच्या थकीत हप्त्यांबाबत सरकार स्तरावर विचार सुरू असल्याची चर्चा आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, थकीत रक्कम दोन टप्प्यांत वितरित केली जाऊ शकते. पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे 3 हजार रुपये, तर दुसऱ्या टप्प्यात एप्रिल आणि मे महिन्यांचे 3 हजार रुपये लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चार महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो.मात्र या संदर्भात राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच थकीत रक्कम वितरणाबाबत शासनाकडून स्पष्ट आदेश किंवा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांनी अधिकृत माहितीची प्रतीक्षा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा :
रिमझिमल्या जलधारा ! मुसळधार पावसाचा उद्यासाठी ‘यलो अलर्ट’