२ हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या P2M UPI व्यवहारांसाठी व्यापाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. मात्र, २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या P2M व्यवहारांवर व्यापाऱ्यांकडून MDR (मर्चंट डिस्काउंट रेट) आकारला जाऊ शकतो. (Rohit Pawar) सध्याच्या व्यवस्थेनुसार, MDR चा दर ०.४ टक्के निश्चित करण्यात आला आहे. या निर्णयावर रोहित पवारांनी पोस्ट लिहून बोचरी टीका केली आहे.

आधी नोटबंदी करून लोकांना रिकामं केलं, नंतर स्वतःच्याच पैशांसाठी संपूर्ण देश रांगेत उभा केला, त्यानंतर मोफत UPI ची थाळी वाजवून ‘डिजिटल इंडिया’च्या नावाने लोकांना ‘कॅशलेस’ केलं आणि आता त्याच व्यवहारांवर ०.४ टक्के MDR वसुलीचा धंदा सुरू केला… हे पैसे व्यापाऱ्यांकडून घेतले जाणार असले तरी शेवटी व्यापारी ते ग्राहकांकडूनच वसूल करणार.. ही आहे गेल्या १२ वर्षांत केंद्रातील भाजप सरकारने केलेली ‘अर्थक्रांती’. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीतून लोकांचे खिसे कापणं सुरूच आहे, (Rohit Pawar) पण आता UPI च्या व्यवहारांवरही कमिशन खाण्याच्या ‘क्रांतिकारी’ निर्णयाबाबत सरकारला अर्थशास्त्रातील खिसे कापण्याचं नोबेल पारितोषिक कधी मिळतंय, याचीच आम्ही वाट पाहत आहोत. अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.
बारकोडवर क्लिक करा आणि पेमेंट करा हा काळ संपुष्टात येणार का? असा प्रश्न केंद्र सरकारच्या निर्णयानंतर उपस्थित होतो आहे. मात्र या निर्णयानंतरही महत्त्वाची बाब ही आहे की जर तुम्ही ग्राहक असाल तर तुम्हाला युपीआय पेमेंटसाठी काहीही शुल्क भरावं लागणार नाही. पण तुम्ही जर व्यापारी असाल तर तुम्हाला युपीआय पेमेंटसाठई ०.४ टक्के शुल्क अर्थात चार्ज भरावा लागणार आहे. हा चार्ज ग्राहकाकडून पेमेंट स्वीकारण्यासाठी असणार आहे. शिवाय २ हजार रुपयांच्या वरील व्यवहारांसाठी व्यापाऱ्यांना हे शुल्क लागू करण्यात आलं आहे.
पर्सन टू पर्सन UPI व्यवहार, व्यवहाराच्या रकमेची मर्यादा नसताना काय? अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की व्यक्तींमधील सर्व व्यवहार पूर्णपणे मोफत राहतील. (Rohit Pawar) कितीही रक्कम पाठवली किंवा प्राप्त केली तरी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. एकूण व्यवहार मूल्यापैकी सुमारे ७० टक्के व्यवहार या प्रकारात येतात. UPI द्वारे पैसे पाठवताना किंवा स्वीकारताना व्यक्तींवर कोणतेही व्यवहार शुल्क, प्लॅटफॉर्म शुल्क किंवा इतर कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही, असे मंत्रालयाने नमूद केले आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?