ग्राहक ग्राहकांनो मोबाईल ॲप्सद्वारे घरबसल्या करा e-KYC?

एलपीजी गॅस कनेक्शनधारकांसाठी आता e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस सिलेंडर बुकिंगमध्ये अडचणी येऊ शकतात किंवा बुकिंग रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र, आता ग्राहकांना गॅस एजन्सीमध्ये जाण्याची आवश्यकता नसून विविध अधिकृत मोबाईल अॅप्स आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून घरबसल्या काही मिनिटांत e-KYC पूर्ण करता येणार आहे.

सरकारने e-KYC अनिवार्य करण्यामागील उद्देश एलपीजी सबसिडी आणि गॅस सिलेंडरचा लाभ पात्र ग्राहकांपर्यंतच पोहोचावा तसेच बनावट कनेक्शन आणि गैरव्यवहारांवर नियंत्रण मिळवणे हा आहे. e-KYC न केल्यास पुढील गॅस सिलेंडर बुकिंगमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. (gas cylinders) काही प्रकरणांमध्ये एजन्सीकडून बुकिंग नाकारले जाण्याचीही शक्यता असल्याने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

इंडियन ऑइलचे ग्राहक IndianOil One अॅप, भारत पेट्रोलियमचे ग्राहक HelloBPCL for Business अॅप आणि एचपी गॅसचे ग्राहक HP Pay अॅपच्या माध्यमातून e-KYC करू शकतात. ही सर्व अॅप्स Google Play Store वर मोफत उपलब्ध आहेत. प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक, एलपीजी ग्राहक क्रमांक आणि नोंदणीवेळी दिलेली माहिती जवळ ठेवणे आवश्यक आहे. (gas cylinders) त्यानंतर संबंधित अॅपमध्ये लॉगिन करून e-KYC पर्याय निवडावा आणि Aadhaar FaceRD अॅपच्या मदतीने फेस स्कॅन किंवा बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करावी. पडताळणी यशस्वी झाल्यानंतर e-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.

ज्या ग्राहकांना मोबाईल अॅप वापरणे सोयीचे वाटत नाही, त्यांच्यासाठी संकेतस्थळाद्वारेही e-KYC करण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह इतर ग्राहक PMUY च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आवश्यक माहिती भरून e-KYC पूर्ण करू शकतात. (gas cylinders) त्यामुळे एजन्सीमध्ये वारंवार जाण्याची गरज राहत नाही आणि प्रक्रिया अधिक सोपी होते. मोबाईल अॅप वापरताना नेटवर्क किंवा तांत्रिक अडचणी आल्यास ग्राहकांनी घाबरून जाऊ नये. अशा वेळी जवळच्या अधिकृत गॅस वितरकाकडे जाऊन बायोमेट्रिक पडताळणीद्वारे e-KYC पूर्ण करता येते. तसेच कोणतीही अडचण असल्यास 1800 2333 555 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून मार्गदर्शन मिळवता येते. त्यामुळे वेळेत e-KYC पूर्ण करून गॅस पुरवठा आणि सबसिडीचा लाभ सुरळीत सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?

सांगली बलात्कार व लूटप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी?

 शिराळ्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा सहाजणांना चावा?