उन्हाळा वाढल्यानंतर आरोग्यासह त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतात.(changes) या दिवसांमध्ये त्वचा अतिशय काळवंडून जाते. त्वचेचा रंग पूर्णपणे बदलून जातो. वाढत्या उन्हाळ्यात त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. वाढलेले टॅनिंग, त्वचेवरील चिकट किंवा तेलकटपणा इत्यादी अनेक गोष्टींमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, वांग येणे, फोड किंवा मुरूम येण्याची जास्त शक्यता असते. टॅनिंग वाढल्यानंतर चेहरा अतिशय काळा आणि निस्तेज दिसू लागतो. त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट वापरले जातात.

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी महिला स्किन ब्राइटनिंग प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र या क्रीम त्वचेसाठी अतिशय घातक आहेत. यामुळे चेहऱ्यावर रॅश किंवा इतर कोणत्याही समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी टोमॅटोचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. टोमॅटो त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. (changes)यामध्ये असलेले घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे कोणत्याही स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी.
टोमॅटो फेशिअल करण्याची सोपी पद्धत:
टोमॅटो फेशिअल करण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटोचा तुकडा कापून त्याच्या आतील बिया काढून घ्या. त्यानंतर त्यावर मध, बेसन घालून त्वचेवर हलक्या हाताने मसाज करून घ्या. (changes)यामुळे त्वचेवरील टॅनिंग निघून जाण्यास मदत होईल. ५ किंवा १० मिनिटं हलक्या हाताने टोमॅटो घासल्यानंतर त्वचा काहीवेळ अशीच राहून द्या. यामुळे त्वचेवरील टॅनिंग निघून जाऊन त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर होईल. याशिवाय टोमॅटो तुम्ही हात, पाय, पाठ किंवा मानेवर घासू शकता. यामुळे टॅनिंग कमी होईल.
टॅनिंग घालवण्यासाठी इतर काही उपाय:
चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी बेसन अतिशय प्रभावी ठरते. बेसनाच्या पिठात चिमूटभर हळद टाकून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा आणि त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्यास आठवडाभरात त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होऊन चेहरा सुंदर दिसेल.

त्वचेवर वाढलेली जळजळ आणि पुरळ कमी करण्यासाठी काकडीच्या रसाचा वापर करावा, काकडी आरोग्यासोबतच त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. यासाठी तयार केलेला काकडीचा रस त्वचेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होईल चेहरा सुंदर दिसू लागेल.
हेही वाचा :
अभिनेत्रीने बॉलिवूडला ठोकला रामराम चाहत्यांना धक्का..!
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया