मुलीला पालकांच्या ताब्यात द्या महाकवे ग्रामस्थांचे कागल पोलीस ठाण्यासमोर तीव्र ठिय्या आंदोलन?

महाकवे (ता. कागल) येथील एका समाजातील बेपत्ता झालेल्या मुलीला तात्काळ तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात द्यावे आणि तिला पळवून नेणाऱ्या संशयितावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी आज महाकवे येथील ग्रामस्थांनी कागल पोलीस ठाण्यासमोर तीव्र ठिय्या आंदोलन सुरू केले. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनात महिला व पुरुषांसह सुमारे १०० ते २०० ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. (missing girl) यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

दोन दिवसांपूर्वी महाकवे येथून एक मुलगी बेपत्ता झाली होती. (missing girl) त्यानंतर ती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाली. पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना बोलावून घेतले होते, मात्र संबंधित मुलीने पालकांसोबत जाण्यास नकार दिला. कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून पोलिसांनी अखेर त्या मुलीची रवानगी कोल्हापूर येथील सुधारगृहात (महिला बालकल्याण केंद्र) केली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उलटसुलट पोस्ट व्हायरल होत असल्याने गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

“जोपर्यंत संबंधित मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले जात नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्याच्या दारातून हटणार नाही,” असा आक्रमक पवित्रा घेत संतप्त ग्रामस्थांनी सकाळीच कागल पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला.राजकीय नेत्यांची मध्यस्थी अपयशी आंदोलनाची तीव्रता पाहून काही स्थानिक राजकीय प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पोलिसांच्या वतीने जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. (missing girl) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलीला पालकांच्या ताब्यात देण्याबाबत कायदेशीर मार्ग काढू, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, संतप्त जमावाने हा प्रस्ताव फेटाळून लावत मुलीला तात्काळ हजर करण्याच्या मागणीवर ठाम राहत आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. या संवेदनशील प्रकरणामुळे कागल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून, परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले आहे.

हेही वाचा :

बच्चू कडू आक्रमक मंत्र्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव केला सादर?

अशैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर?

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये जगाला दिसली भारताची ताकद : मोदी?