मृत्युदंडाच्या शिक्षेला जागतिक स्थगिती

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

खुनासारख्या अतिशय गंभीर गुण्यासाठी देह दंडाची शिक्षा देण्याची तरतूद अनेक शतकांपासून भारतासह जगभरात करण्यात आली होती. आणि आजही बहुतांशी देशांमध्ये अशा प्रकारची शिक्षा दिली जाते. त्याची अंमलबजावणी केली जाते. अगदी गेल्याच महिन्यात बांगलादेशातील एका दाम्पत्याचा सौदी अरेबियामध्ये तलवारीने शिरच्छेद करून मृत्युदंडाची शिक्षा दिली गेली. (centuries) त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने महासभा बोलावण्याचा निर्णय घेतला. गेल्याच आठवड्यात मृत्युदंडाच्या शिक्षेला जागतिक स्थगिती देण्याचा ठराव संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. भारतासह अमेरिका, चीन, वगैरे 33 देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. आता या ठरावामुळे मृत्युदंडाच्या शिक्षेवर जगभर विचार मंथन होईल. मानवतावाद्यांना या निमित्ताने एक विषय चघळण्यासाठी मिळाला आहे.

राष्ट्रसंघाच्या महासभेत 133 देशांनी मृत्यू दंड जागतिक स्थगिती प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव मेक्सिको देशाच्या राष्ट्रसंघातील प्रतिनिधीने महासभेत मांडला होता. अर्थात हा ठराव बहुमताने पारित करण्यात आला असला तरी तो कोणत्याही देशाला बंधनकारक नाही. नागरी व राजकीय का वरील आंतरराष्ट्रीय कराराच्या कलम सहा नुसार विशिष्ट अटींच्या अधीन राहून फाशी ची शिक्षा देण्याची परवानगी जगभरातील देशांना देण्यात आली आहे. मृत्युदंड असावा किंवा नसावा याबद्दल आजपर्यंत (centuries) अनेकदा जागतिक मंचावर चर्चा झाली आहे पण त्याबद्दल एक वाक्यता आढळून आलेली नाही. भारतामध्ये खुनासारख्या गुन्ह्यासाठी मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे आणि ती अनेक शतकांपासून चालू आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवशाहीत रायगड किल्ल्याच्या टकमक टेकडीवरून ढकलून देऊन मृत्युदंड दिला जात होता. त्यानंतर भारतीय न्याय संहितेमध्ये फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

भारतामध्ये दुर्मिळातील दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावली जाते. मात्र ती प्रत्यक्षात अंमलबजावणी करेपर्यंत अनेक पातळ्यांवर ती कायम करावी लागते. गुन्हेगाराला अगदी शेवटपर्यंत बचाव करण्याची संधी भारतीय कायद्यामध्ये दिली जाते. आणि म्हणूनच फाशीच्या शिक्षेला मान्यता आहे.भारतामध्ये काही मानवतावादी संघटना किंवा व्यक्ती आहेत. त्यांनी दहशतवादी अफजल गुरु तसेच याकूब मेमन या देशद्रोह्यांच्या फाशीच्या शिक्षेला विरोध केला होता. भारतात अगदी अलीकडच्या काळात कसाबला फासावर लटकवण्यात आले होते. जोपर्यंत दुर्मिळातील दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या गुन्ह्यांमध्ये घट होत नाही किंवा अशा प्रकारचे गुन्हे बंद झाले झाले आहेत अशी परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद ठेवली गेली पाहिजे.

खूनासारखा गुन्हा जगभर अतिशय गंभीर स्वरूपाचा मानला गेला आहे. अशा गुन्ह्याला अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा ठोठावली जाते. पूर्वी फाशीची शिक्षा हा नियम आणि जन्मठेपेची शिक्षा हा अपवाद समजला जात होता. आता मात्र फाशीची शिक्षा अपवादात्मक मानली गेली आहे. मृत्युदंडाची शिक्षा वेगवेगळ्या प्रकारे दिले जाते. इस्लामिक राष्ट्रांमध्ये अर्थात जेथे शरियत कायदा आहे, तेथे तलवारीने शिरच्छेद करून मृत्युदंड दिला जातो. अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये विषारी इंजेक्शन देऊन गुन्हेगाराला मारले जाते. काही ठिकाणी फासावर लटकावले जाते. इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेन याला फासावर लटकवण्यात आले होते. केवळ दीड ते दोन मिनिटांमध्ये जीव जातो तो फासामुळे. अशा प्रकारच्या शिक्षेमध्ये संबंधित गुन्हेगाराला काही क्षण वेदना होतात. अत्यंत कमी वेदनामध्ये जीव घेण्यासाठी फाशीच्या शिक्षेचा अवलंब केला जातो.

गेल्या महिन्याभरात सौदी अरेबिया च्या न्यायालयाने बांगलादेशातील दांपत्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावल्यानंतर आणि त्याची अंमलबजावणी भर रस्त्यामध्ये केल्यानंतर जगभर खळबळ उडाली होती आणि हळहळ ही व्यक्त करण्यात आली होती. (centuries) त्याची दखल घेऊनच संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत मृत्युदंड शिक्षेला जागतिक स्थगिती मिळावी अशी मागणी करणारा ठराव मांडला गेलेला असावा. आता पुन्हा या शिक्षेबद्दल जगभर विविध मंचावरून विचार मंथन होईल. पण नंतर काहीच घडणार नाही. हे आजपर्यंतचे वास्तव आहे.

हेही वाचा : 

मोठी बातमी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, मनसेत मोठा पक्षप्रवेश, मुंबईत घडामोडींना वेग

अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची गर्दी

हुपरीमध्ये आगीत तीन घरे भस्मसात