वायसी पॉलिटेक्निकमध्ये एआयएमएल व मेकॅट्रॉनिक्स अभ्यासक्रमांना एआयसीटीईची मान्यता — दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची सुवर्णसंधी

इचलकरंजी, ता. ७ मे: डीकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक (वायसीपी) संस्थेने शिक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. देशातील उच्च शिक्षण नियामक संस्था एआयसीटीई, दिल्ली यांनी वायसीपीला डिप्लोमा इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AIML) आणि डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स या दोन नावीन्यपूर्ण व उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. हे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरु होत असून, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना(students) या क्षेत्रात प्रवेश घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ६० जागा उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल लागल्यानंतर डीटीईच्या पोर्टलवर नोंदणी करून कॅप राउंडच्या माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे. संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात AI व मेकॅट्रॉनिक्स क्षेत्रात प्रचंड प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर पालक व विद्यार्थ्यांकडून(students) आलेल्या मागणीनुसार संस्थेने एआयसीटीईकडे प्रस्ताव सादर केला होता आणि त्याला मान्यता मिळालेली आहे.

AI/ML हा संगणक अभियांत्रिकीचा एक विकसित उपविभाग असून, यामध्ये मशीन लर्निंग, डीप लर्निंग, डेटा सायन्स, नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि IoT यांचा समावेश आहे. या कोर्समुळे विद्यार्थ्यांना संशोधन व नोकरीच्या अनेक संधी प्राप्त होणार आहेत. दुसरीकडे, मेकॅट्रॉनिक्स ही एक बहु-शाखीय प्रणाली असून यात यांत्रिक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकीय प्रणालींचा समावेश आहे. या क्षेत्रात काम करणारे अभियंते ऑटोमोटिव्ह कंट्रोल सिस्टम्स, रोबोटिक्स आणि स्मार्ट डिव्हाइसेस यांसारख्या क्षेत्रांत कार्यरत राहू शकतात.

वायसीपीमध्ये आधीपासून चालू असलेल्या संगणक, इलेक्ट्रिकल, इलेक्टॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिव्हील आणि मेकॅनिकल शाखांना एनबीएचे मानांकन मिळाले आहे. संस्थेकडे तज्ञ प्राध्यापक, अद्ययावत लॅब्स, वर्कशॉप्स, ग्रंथालय व डिजिटल शिक्षण पायाभूत सुविधा आहेत. संस्थेने स्थापनेपासून शंभर टक्के निकाल आणि उत्तम प्लेसमेंटची परंपरा कायम राखलेली आहे. अनेक विद्यार्थी(students) देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत.

या अभ्यासक्रमांसाठी मान्यता मिळवण्यात संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, संचालिका डॉ. एल.एस. अडमुठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. पत्रकार परिषदेला प्राचार्य ए.पी. कोथळी, उपप्राचार्य बी.ए. टारे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा :

“देश के गद्दार हैं…, बुरखा घातलेल्या महिलेने पाकिस्तानच्या झेंड्याचे स्टिकर्स काढले, Video Viral

प्रसिद्ध अभिनेत्रीची युद्धविरोधी भूमिका, म्हणाली “हे लज्जास्पद आहे, निष्पाप लोकांवर…”

अंगाला लागली हळद अन् लग्नाच्या एक दिवसाआधी वधूचा हार्ट अटॅकने मृत्यू; Video Viral