त्यानंतर 30 मे पर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली,(warning)मात्र त्यानंतर पावसात खंड पडला, दरम्यान दहा जूननंतर राज्यात पुन्हा पाऊस झाला आणि त्यानंतर परत खंड पडला, मुंबई वगळता इतर भागांमध्ये अत्यल्प पाऊस झाला.आता दिलासादायक बाब म्हणजे वीस जूननंतर पावसाचा वेग वाढला असून, अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे, (warning)विदर्भात जोरदार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान येत्या 24 तासांमध्ये नागपूर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.बुधवारी रात्री पावसाने धुवाधार हजेरी लावली, मात्र गुरुवारी दिवसभर फक्त ढगाळ वातावरण होतं(warning), त्यानंतर गुरुवारी संध्याकाळपासून पावसाची रिपरिप जिल्ह्यात सर्वत्र सुरू झाली, सावनेर तालुक्यात सर्वाधिक 56 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
वणवा पेटण्यास सुरूवात, हिंदी सक्तीविरोधात भाजपात पहिला राजीनामा
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार