वस्त्रनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजी शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजना आणि जलवाहिनी टाकण्याच्या कामांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. शहरातील अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले असून (Ichalkaranji) त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालक, पादचारी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रस्त्यांची दुरवस्था इतकी गंभीर झाली आहे की नागरिकांनी आता शहराला उपरोधिकपणे ” “इचलकरंजी” असे संबोधण्यास सुरुवात केली आहे. विकासकामांच्या नियोजनातील त्रुटींवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, पावसाळ्यापूर्वी रस्ते पूर्ववत करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. चिखल, खड्डे आणि वाहतुकीची कोंडी यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून (Ichalkaranji) अनेक ठिकाणी अपघातांचाही धोका वाढला आहे.
नागरिकांच्या वाढत्या संतापाची दखल घेत महापौरांनी संबंधित विभागाला सुरू असलेली कामे तातडीने थांबवण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. (Ichalkaranji) तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, शहरातील परिस्थिती पाहता विकासकामांचे योग्य नियोजन आणि दर्जेदार अंमलबजावणी कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा :
LPG गॅस सिलिंडरचे संकट संपणार, भारतीय तेल कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय?
शिवसेनेचे सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेससोबत?
बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनो सावधान? तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?