भारत आणि व्हेनेझुएला यांनी गुरुवारी ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारी करण्यावर आणि (India and Venezuela) आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यावर सहमती दर्शवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यात झालेल्या व्यापक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशांमधील सहकार्य केवळ ऊर्जा क्षेत्रापुरते मर्यादित न राहता महत्त्वाची खनिजे, औषधनिर्माण (फार्मास्युटिकल्स), कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रांपर्यंत वाढवले जाणार आहे.

पश्चिम आशियातील संघर्षामुळे खनिज तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने कच्च्या तेलाच्या आयातीसाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. (India and Venezuela) गेल्या काही महिन्यांत भारताने व्हेनेझुएलाकडून तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढवली असून, व्हेनेझुएला भारताला तेल पुरवणारा तिसरा मोठा देश बनला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पूर्व) रुद्रेन्द्र टंडन यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार पाहता व्हेनेझुएला भारताकडे एक पसंतीचा ऊर्जा भागीदार आणि स्थिर खरेदीदार म्हणून पाहत आहे.
हेही वाचा :
‘तर थेट कारवाई करू’ महाविद्यालयांना मोठा झटका
भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, VIDEO द्वारे व्यक्त केली नाराजी
“आता रम्मी नाही तर आता तीन पत्ती खेळ सत्ताधारी कलंकित मंत्र्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा ‘आक्रोश’