कोल्हापूर ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मंदिरासह परिसरातील गावांच्या विकासासाठी घोषित केलेल्या स्वतंत्र प्राधिकरणाला आता गती येणार आहे. या प्राधिकरणाच्या अधिसूचनेसाठी तयार (Kolhapur) करण्यात येणाऱ्या मसुद्याबाबत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत मंगळवारी ऑनलाईन बैठक झाली.

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलगंणा आदी राज्यातील लोकाभाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जोतिबा मंदिर आणि परिसराचा तिरूपतीच्या धर्तीवर विकास व्हावा याकरिता श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र परिसर बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाची जानेवारी २०२३ मध्ये घोषणा करण्यात आली आहे. जोतिबा मंदिर परिसरातील १० किमी अंतरातील गावांचा समावेश असलेला प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. (Kolhapur)यानंतर हे प्राधिकरण कसे असावे, त्याची प्रशासकीय रचना कशी असावी, त्याचे कामकाजाचे स्वरूप कसे असावे, त्याला अधिकार कोणते द्यावे आदीनुसार या प्राधिकरणाचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च २०२५ मध्ये प्राधिकरणाचा प्रस्ताव सादर करा, त्याला तत्काळ मंजुरी दिली जाईल असे सांगितले होते. मात्र, काही काळ प्राधिकरणाच्या कामकाजाला गती आली नव्हती. आता या प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी गती आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सांयकाळी झालेल्या बैठकीत प्राधिकरणाची अधिसूचना काढण्यात येणार आहे. (Kolhapur) त्याकरिता मसुदा तयार केला जाणार आहे. या मसुद्यातील विविध मुद्द्यांबाबत चर्चा झाली. प्राधिकरणाची रचना कशी असावी यासह त्याचे कामकाज, अधिकार आदींबाबतही या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत मसुदा तयार करण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या. त्यानुसार कालबद्ध पद्धतीने हे काम गतीने पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, देवस्थान समितीचे पदाधिकारी, अधिकारी आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
दिशा सालियान हिच्या वडिलांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंकडे इशारा करत म्हटले?
विसर्जनापूर्वी गणरायाच्या कानात म्हणा, सर्व इच्छा होतील पूर्ण?