जर तुम्ही मेसेजिंग आणि चॅटिंगसाठी WhatsApp वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत व्हॉट्सअॅपवर लॉगआउट करण्याचा पर्याय नव्हता. जर एखाद्याला ब्रेक हवा असेल तर त्यांना अॅप अनइंस्टॉल करावे लागायचे किंवा अकाऊंट हटवावे लागायचे. पण आता नव्या लॉगआऊट फिचरमुळे हे सहज शक्य होणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे जे वापरकर्त्यांना त्यांच्या अकाउंट मॅनेजमेंटवर अधिक नियंत्रण देईल. विशेषतः जेव्हा ते अॅपमधून ब्रेक घेऊ इच्छितात. याचा अर्थ असा की लवकरच WhatsApp यूजर्सला अकाऊंट लॉगआउट करण्याचा ऑप्शन मिळणार असून तोही कोणतेही चॅट डेटा न गमावता.
नव्या फीचरमध्ये यूजरला काय मिळणार
व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरमध्ये यूजर्सना तीन पर्याय मिळणार असल्याचे सांगितले जात आहेत. ज्यात
Erase all data & preferences- यामुळे सर्व चॅट्स आणि सेटिंग्स डिलीट होतील.
Keep all data & preferences- यामुळे लॉगआऊट होता येईल पण डेटा आणि चॅट्स फोनमध्येच सुरक्षित राहिल.
Cancel- जर तुमचा मूड बदलला तर, वरचे दोन्ही पर्याय कॅन्सल झाला तर…
व्हॉट्सअॅपचं लॉगआऊट फिटर सध्या विकास टप्प्यावर असून, हे फिचर आऊट झाल्यावर सर्वप्रथम प्रथम बीटा यूजर्ससाठी उपलब्ध होणार असून, सर्व सामान्य यूजर्सना हे कधीपासून वापरता येईल याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती किंवा तारीख समोर आलेली नाही. मात्र. हे नवे फिचर लाँच झाले तर, ते व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी गेम-चेंजर ठरू शकते.
हेही वाचा :