सांगली कौटुंबिक वादातून तक्रार देण्यासाठी आलेल्या आईवर मुलानेच पोलिस ठाण्याच्या आवारात धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना सांगली शहर पोलिस ठाण्याच्या आवारात घडली.(premises) या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली असून, पोलिसांनी संशयित मुलाला तत्काळ अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सारिका पोपट चव्हाण (वय ४०, सध्या रा. केंगार गल्ली, सांगली) असे जखमी आईचे नाव असून, सतीश पोपट चव्हाण (वय २३, मूळ रा. वायफळे, ता. तासगाव, सध्या रा. काँग्रेस भवनजवळ, सांगली) असे अटकेतील मुलाचे नाव आहे. वायफळे येथील मूळ रहिवासी असलेल्या सारिका आणि त्यांचा मुलगा सतीश यांच्यात कौटुंबिक कारणावरून सतत वाद होत होते. सतीश हा आईला वारंवार (premises) मारहाण करून त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून सारिका सोमवारी रात्री दहाच्या सुमारास सांगली शहर पोलिस ठाण्यात मुलाविरोधात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. ही माहिती समजताच सतीशने पोलिस ठाण्याचा परिसर गाठला.
सारिका पोलिस ठाण्याच्या मुख्य गेटजवळ पोहोचताच सतीशने खिशातून चाकू काढून त्यांच्या पाठीवर आणि छातीवर सपासप वार केले. अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे सारिका यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकताच पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली. हल्लेखोर सतीशला जागीच पकडण्यात आले. सारिका यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.याप्रकरणी पोलिस कर्मचारी योगेश हाक्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलिस ठाण्यात संशयित सतीशविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. (premises) याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा :
पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल? सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं?