स्मित मच्छार यांना थेट नरेंद्र मोदी यांचा फोन, कुटुंबियांना दिले मोठे वचन, 180 लोकांसाठी भिडणारा..

फ्लायदुबईचा भारतीय पायलट स्मित मच्छार याच्यावर जगभरातून काैतुक होत आहे. (President) त्यातच स्मितने जे केले त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्षही त्याचे काैतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मच्छार यांच्या कुटुंबियांना फोन केला.

फ्लायदुबईचा भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी जी कामगिरी केली, त्यांच्या या कामगिरीचे जगभरात काैतुक होत आहे. अनेक देशांच्या पंतप्रधानांनी त्यांचे काैतुक केले. स्मित मच्छार यांनी जे धैर्य आणि शाैर्य दाखवले ते कमी जणांना दाखवता येते. आज त्यांच्यामुळेच 180 जण विमानातील जिवंत आहेत. फ्लायदुबईचे विमान तेल अवीवकडे निघाले होते. दुबईहून हे विमान निघाले. मात्र, विमानाचा को पायलटने थेट पायलट असलेल्या स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला. (President) यादरम्यानच जखमी असतानाही आपत्कालीन स्थितीचे कोड स्मित मच्छर यांनी पाठवले. विमान कोणत्यातरी आपत्कालीन स्थिती असल्याचा संदेश पोहोचला. त्यानंतर इस्त्रायलमध्ये घडामोडींना वेग आला. या विमानाचे अपहरण झाल्याचे सांगितले जात होते. इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी तात्काळ बैठक बोलावली.

फ्लायदुबईच्या विमानात असलेल्या को पायलटने स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करत विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्ला झाल्यानंतरही विमान क्रॅश होण्यापासून स्मित मच्छार यांनी वाचवले. त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि आवाज दिला. विमानातील प्रवाशांच्या लक्षात आले की, नक्की काय घडतंय. प्रवाशांनी विमानाचा ओमानचा को पायलट याला पकडले.(President) त्यानंतर जखमी असतानाही स्मित यांनी सुरक्षित विमान उतरवले. ज्यानंतर स्मित यांचे जोरदार काैतुक केले जात आहे. 180 जणांचा जीव वाचवण्यासाठी भिडणारा भारतीय पायलटचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काैतुक केले. नुसते काैतुकच नाही तर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कुटुंबियांनाही फोन केला. स्मित मच्छार यांच्या कुटुंबियांसोबत फोनवर संवाद साधला.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, पायलट मच्छार यांच्यावर सध्या साैदी अरेबियाच्या एका हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. पायलटची स्थिती स्थिर असल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर ते गंभीर जखमी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मित मच्छार यांच्या कुटुंबियांना फोन करत सांगितले की, भारतीय दूतावास सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. कुटुंबात प्रत्येक प्रकारची मदत केली जाईल. या फोनवरील संवादापूर्वी नरेंद्र मोदी यांनी स्मित मच्छार यांच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली.

हेही वाचा : 

बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती

शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी

धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार