1 ऑक्टोबर म्हणजेच महिन्याच्या सुरुवातीपासून ग्राहकांच्या दैनंदिन खर्चाशी संबंधित अनेक गोष्टी महागल्या आहेत. येत्या काळात सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच या वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्याने आता महागाईचा फटका थेट खिशाला बसताना दिसत आहे. आजपासून नेमक्या कोणत्या गोष्टी महागल्या आहेत आणि कोणत्या गोष्टींमध्ये दिलासा मिळाला, जाणून घ्या.

सरकारी तेल कंपन्यांनी 1 ऑक्टोबरपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. (consumers) शहरानुसार ही वाढ सुमारे 62.50 ते 71.50 रुपयांपर्यंत आहे. दिल्लीमध्ये सिलिंडरचा दर 2,810 रुपये झाला असून, मुंबईत 2,764.50 रुपये, कोलकात्यात 2,954 रुपये आणि चेन्नईत 2,983 रुपये झाला आहे. या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग, मिठाईची दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांवर होऊ शकतो. सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी वाढत असताना स्वयंपाकाच्या इंधनाचा खर्च वाढल्याने व्यावसायिकांच्या एकूण खर्चावर परिणाम होण्याची शक्यता असून शेअवती खाद्यपदार्थांच्या किमती वधू शकतात. सणासुदीच्या खरेदीपूर्वी ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमती वाढण्याची शक्यता. उद्योगातील माहितीनुसार, AC, LED टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशीनसारख्या वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होत आहे.
काही अहवालांनुसार ऑक्टोबरपासून किमतीत साधारण 5 ते 8 टक्क्यांची वाढ होऊ शकते. तांबे, पोलाद, अॅल्युमिनियम यांसारख्या कच्च्या मालाच्या किमती, वाहतूक खर्च, चलनातील चढ-उतार आणि इतर उत्पादन खर्च यामागे असल्याचे सांगितले जात आहे. ही 2026 मधील या क्षेत्रातील तिसरी दरवाढ असल्याचेही उद्योग अहवालांमध्ये सांगितले आहे. (consumers) म्हणजेच आता 50 हजार रुपयांचा AC 5 ते 8 टक्क्यांनी महागल्यास त्यासाठी सुमारे 2,500 ते 4,000 रुपये अधिक मोजावे लागू शकतात.
विमान प्रवाशांसाठीही ऑक्टोबरची सुरुवात महत्त्वाची ठरली आहे. 1 ऑक्टोबरपासून विमान इंधन म्हणजेच एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या किमतीत सुमारे 16 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी ATFचा दर सुमारे 121 रुपयांवरून 137 रुपये प्रति लिटर झाला आहे. विमान कंपन्यांच्या खर्चात इंधनाचा मोठा वाटा असल्याने ATF महागल्याचा परिणाम तिकीट दरांवर होण्याची शक्यता असते. मात्र, तिकीट दर तात्काळ किती वाढतील, हे येत्या काही दिवसांत समजेल.
मुंबईत प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांसाठीही 1 ऑक्टोबरपासून टोल वाढवण्यात आला आहे. शहरातील पाच टोल नाक्यांवर सुमारे 20 टक्के वाढ लागू झाली आहे. मिनी बस आणि हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी टोल 75 रुपयांवरून 90 रुपये, बस आणि ट्रकसाठी 150 रुपयांवरून 180 रुपये, तर अवजड मोटार वाहनांसाठी 180 रुपयांवरून 225 रुपये करण्यात आला आहे. वाशी, मुलुंड, ऐरोली आणि दहिसर येथील प्रवेशमार्गांवर हे दर लागू आहेत. मात्र, हलकी मोटार वाहने, शाळेच्या बस आणि राज्य परिवहनच्या बस यांना असलेली टोलमाफी कायम आहे. व्यावसायिक सिलिंडर महागला असला तरी घरगुती वापराच्या 14.2 किलो LPG सिलिंडरच्या दरात 1 ऑक्टोबरला कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये घरगुती सिलिंडरचा दर 942 रुपये, तर मुंबईत 941.50 रुपये आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांवर या महिन्याच्या सुरुवातीला थेट दरवाढीचा परिणाम झालेला नाही.
या सर्व दरवाढीच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे ऑक्टोबरच्या सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात बदल करण्यात आलेला नाही. (consumers) त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी इंधन भरणाऱ्या ग्राहकांवर या महिन्याच्या सुरुवातीला भार पडलेला नाही. त्यामुळे या महिन्यात गोष्टी स्वस्त झाल्या नसल्या तरी काहीसा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा :
बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती