आता राष्ट्रपतीच सोडवू शकतात “महादेवी’ चा घटनात्मक पेंच

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

नांदणी जैन मठातील माधुरी उर्फ महादेवी ही हत्तीण आमचा सांस्कृतिक ठेवा आहे,(solve)ती आमची श्रद्धा आहे, ती आमची परंपरा आहे ती अबाधित राहू द्या! या लोक भावनेतून हा प्रश्न आता अति संवेदनशील बनला आहे. तथापि लोक भावना आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या दोन बाबी परस्पर विरोधी आहेत आणि त्यामध्ये देशाच्या महामहिम द्रौपदी मुर्मू याच हस्तक्षेप करू शकतात. लोक भावनेला न्याय देण्याचा त्यांनाच या प्रकरणात अधिकार आहे. आणि म्हणूनच त्यांना साकडे घालण्यासाठी रविवारी काढण्यात आलेल्या नांदणी ते कोल्हापूर या आत्मक्लेश पदयात्रेला एक वेगळ्या प्रकारचे अधिष्ठान लाभलेले होते.

आता” महादेवी “हा प्रश्न केवळ एका जिल्ह्याचा किंवा जैन मठाचा राहिलेला नाही तर तो आता राज्याचा बनत चाललेला आहे. सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांच्या संरक्षणासाठी” पेटा” ही संस्था काम करत असते. नांदणी जैन मठातील महादेवी ची‌ देखभाल चांगल्या प्रकारे केली जात नाही. तिचे प्रदर्शन केले जाते. मिरवणुकामध्ये फिरवले जातेतिच्या माध्यमातून पैसे गोळा केले जातात अशा प्रकारच्या हरकती घेऊन महादेवी लाताब्यात घेऊन तिचे अन्यत्र निवारा नियोजन करावे अशा आशयाची एक याचिका या संस्थेच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने महादेवी ला ताब्यात घेऊन तिची गुजरात मधील वनतारा या कल्याण केंद्रात पाठवणी करावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला नांदणी मठाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

तथापि सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. परिणामी महादेवी ला वनतारा कल्याण केंद्रात पाठवण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता.(solve) गेल्या सोमवारी तिला ताब्यात घेण्यात आले. सध्या ती वन तारा कल्याण केंद्रामध्ये आहे. गेल्या 35 वर्षांपासून माधुरी उर्फ महादेवी ही नांदणी जैन मठात होती. तिचा सर्वांना लळा लागला होता. तिच्याशिवाय नांदणीचा मठ मोकळा मोकळा वाटत होता. तिची गैरहजेरी प्रत्येकाच्या मनाला वेदना देत होती. त्यानंतर महादेवी ही आमची लाडकी लेक आहे तिला आमच्या ताब्यात द्या

अशी मागणी होऊ लागली आणि या मागणीने जोर धरला.महादेवीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असल्यामुळे त्यामध्ये राज्य शासनाला, केंद्र शासनाला हस्तक्षेप करता येत नाही. शिवाय वन्यजीव कायदा 1972 अंतर्गत महादेवी चा निर्णय झाला असल्यामुळे तो कायदा बाजूला ठेवून या संदर्भात विचार करता येत नाही. राज्य किंवा देश हा कायद्याच्या चौकटीत असतो. राज्यकर्त्यांना कोणताही कायदा धाब्यावर बसवता येत नाही. कायद्याची प्रतिष्ठा कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवण्याची जबाबदारी शासनावर असते.

आणि म्हणूनच महादेवी ला आम्ही परत आणू असे ठोस आश्वासन शासनाकडून मिळालेले नाही आणि ते स्वाभाविकही आह महादेवी ला पुन्हा नांदणी जैन मठात आणावयाचे झाल्यास मठाच्या वतीने”फेरविचार करण्याची विनंती याचिका”सर्वोच्च न्यायालयात केली गेली पाहिजे. कायदा आणि लोकभावना यांची सांगड घालण्याचे आवाहन सर्वोच्च न्यायालयाला करता येईल पण त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा कायदेशीर बाबी तपासून दिलेला आहे.

महादेवी साठी देशाच्या महामहिम अर्थात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना साकडे घालावे लागेल. कारण त्यांना या प्रकरणी लोकभावना लक्षात घेऊन हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. धार्मिक परंपरा जपण्याचा अधिकार भारताच्या संविधानाने दिलेला आहे. आणि हिंदू धर्मात हत्तीला श्री गणेशाच्या रूपात पाहिले जाते. त्याची पूजा केली जाते. नांदणीच्या जैन मठातील माधुरी उर्फ महादेवी कडे देवत्वाच्या भावनेनेच पाहिले जात होते.(solve) अशा प्रकारची भूमिका या प्रकरणी घ्यावी लागेल किंवा घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी नांदणी ते कोल्हापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय या 45 किलोमीटर अंतराची आत्मक्लेष पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. त्यामध्ये महिलांचाही सहभाग मोठा होता. या पदयात्रेचे नेतृत्व राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, सावकार मादनाईक, संजय पाटील यड्रावकर वगैरेनी केले होते.

“कम बॅक महादेवी”हे अभियान आता इतर जिल्ह्यातही सुरू केले जाईल.
इंदापूर, माळशिरस वगैरे भागातून महादेवी विषयी तिला परत पाठवण्याची मागणी होऊ लागली आहे. एकूणच महादेवी हा अति संवेदनशील विषय बनला असला तरी, तिला कोणत्याही स्थितीत वनतारा कल्याण केंद्रातून माघारी नांदणी जैन मठात पाठवावे अशी लोकभावना तयार झालेली आहे. पण तरीही तो घटनात्मक पेन्च असून त्यावर कसा निर्णय घेतला जातो याकडे पाहावे लागेल.

हेही वाचा :

विराटसोबतच्या अफेअरचा विषय निघताच तमन्नानं सगळं सांगितलं… लग्नाबद्दल म्हणाली…
संतापजनक! शाळेत जात असतांना बळजबरीने गाडीत बसवलं, विनयभंग केला, पाईपने मारहाण केली
या शेतकऱ्यांना २००० नव्हे तर ७००० मिळाले; तुम्हाला आले का? वाचा सविस्तर