मनोरंजन विश्व जेवढं ग्लॅमरस तेवढंच तिथे अनेक भयानक गोष्टीही घडत असतात.(glamorous) खास करुन अभिनेत्रींना अनेक अडचणी आणि वाईट अनुभवांना सामोरं जावं लागतं. अशातच अभिनेत्री ऐश्वर्यासोबत असाच काहीसा प्रसंग घडला. जो सध्या सोशल मीडियावर सर्वांच्या भुवया उंचवत आहे.टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा आज घराघरात ओळखली जाते.‘घुम हैं किसीके प्यार में’ या मालिकेत पाखी म्हणून ती घराघरांत पोहोचली. यामुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली.

ऐश्वर्या आज जरी यशाच्या शिखरावर असली तरी तिला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं. इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणं तितकं सोपं नव्हतं. ऐश्वर्याने अनेक ऑडिशन दिली, परंतु प्रारंभिक काळात तिला नकारच मिळत होते.ऐश्वर्या म्हणते, ‘माझा करिअर सुरु करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली.(glamorous) अनेकदा ऑडिशन्स दिल्या, पण काम मिळविणं कठीण होतं. त्यानंतर, काही छोट्या भूमिका मिळाल्या, परंतु या यशामध्ये खूप अडचणी होत्या.’
एका मुलाखतीत ती सांगते की, सुरुवातीच्या काळात तिला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव आला. ती म्हणाली, “एक निर्मात्याने मला लोखंडवाला बॅक रोडवर बोलावलं. तिथे पोहोचल्यावर, गाडीत बसल्यानंतर तो निर्माता अचानक माझ्या शेजारी बसला आणि माझ्या केसांना हात लावू लागला.(glamorous) त्याचं लक्ष माझ्या शरीरावर होतं. मी त्याला थांबवायला सांगितलं आणि विचारलं, ‘तुम्ही काय करत आहात?’ त्यावर त्याने सांगितलं, ‘तडजोड केल्याशिवाय इंडस्ट्रीमध्ये काम मिळणार नाही.’ हे ऐकून मला खूप धक्का बसला.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी तिथून ताबडतोब गाडीतून खाली उतरणं पसंत केलं आणि रडत रडत घराच्या दिशेने पळायला लागले. या सगळ्या अनुभवावर मी लगेच बाबांना फोन केला. त्यांना सगळं सांगितलं. बाबांनी मला समजावलं आणि सांगितलं, ‘घाबरू नकोस, अशा लोकांपासून दूर राहा.'”आज ऐश्वर्या शर्मा प्रसिद्ध चेहरा आहे. टीव्हीसोबत ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. चाहत्यांसोबत फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
हेही वाचा :
वैष्णवी हगवणे प्रकरण भोवले! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
डोनाल्ड ट्रम्पचे ‘Air Force One’ जगात भारी; राजेशाही थाट पाहून तुमचेही डोळे दीपतील
हॉटेलमधून चेक आउट करताना रुममधील ‘या’ 5 वस्तू घरी घेऊन जाऊ शकता