शरद पवारांचा दुष्काळ दौरा पक्षाच्या दोन आमदारांची दांडी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांनी सोलापूरच्या माढा तालुक्यातून आपल्या या दौऱ्याची सुरुवात केली आहे. मात्र त्याचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला आहे.

यंदा राज्यात पाऊसच झाला नाही, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचं मोठं संकट निर्माण झालं आहे. यावर्षी पावसाभावी पिकंच न आल्यामुळे अन्नधान्य तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी अडचणीत सापडले आहेत. (Sharad Pawar) दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांनी सोलापूरच्या माढा तालुक्यातून आपल्या या दौऱ्याची सुरुवात केली आहे. माढ्याच्या तुळशी गावाला भेट देऊन शरद पवार यांनी तेथील परिस्थिती जाणून घेतली, तसेच त्यांनी यावेळी गावाला मदत म्हणून 50 लाख रुपयांचा धनादेश देखील दिला आहे. या मदतीसाठी ग्रमास्थांनी शरद पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

मात्र शरद पवार यांचा हा दुष्काळ पाहाणी दौरा आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे, (Sharad Pawar) तो म्हणजे शरद पवार यांच्या या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटातील दोन आमदारांनी दांडी मारली आहे. शरद पवार यांच्या माढ्यातील दुष्काळ पहाणी दौऱ्यावेळी माळशिरसचे आणि करमाळ्याचे आमदार गैरहजर आहेत. आमदार नारायण पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी या दौऱ्याकडे पाठ फिरवली असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

शरद पवार यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, मोहोळचे आमादर राजू खरे हे उपस्थित आहेत. (Sharad Pawar) मात्र दुसरीकडे आमदार नारायण पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर हे गैरहजर असल्याचं पहायला मिळत आहे. नारायण पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार आहेत, तर उत्तम जानकर हे माळशिरसचे आमदार आहेत. शरद पवार यांनी आपल्या या दौऱ्यावेळी दुष्काळी परिस्थितीचा आढवा घेऊन ग्रामस्थांना मदतीचा हात दिला आहे, त्यांनी मदत म्हणून पन्नास लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. ग्रामस्थांनी देखील यावेळी शरद पवार यांचे आभार मानले.

हेही वाचा : 

नोव्हेंबरमध्ये बँका एकूण 17 दिवस बंद असणार, महाराष्ट्रात किती दिवस

लेक लाडकी योजनेच्या नियमात मोठा बदल, आदिती तटकरे यांची मोठी घोषणा, आता थेट

ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक घेणार : पालकमंत्री